कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे की आपण आता कौटूंबीक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.

वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून जावे की, ” पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे “.

बसल्या बसल्या ह्या तुरिच्या शेंगातील दाणे काढा ,असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे. *वय वर्ष 55/60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवु नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले , नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला , कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो ,फारसी चौकशी होत नाही, तुम्हीमाञ मनात उजळणी करत असता , ह्याला मी शेत घेण्यास,व्यापार करण्यास पैसे दिले होते.* *सगळे कटू अनुभव जमा झाले असतील , कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.* *नाते बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत , दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.* *तरीपण एक नात अजून टिकेल आहे , एक फोन चालु आहे , ते नातं मुलीचं, तितक्यात मुलीचा फोन येतो , ती विचारते--- बाबा गेले होते का दवाखान्यात ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झाल काय ? नाना प्रश्न काळजीचे , आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात..* *थोडा पश्चातापही होत असतो , मुलीसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, तिने मात्र भावासाठी प्रॉपर्टीचा वाटा मागितला नाही , भलेही भाऊ तिच्याशी फोनवर बोलत नसला तरीही.* *लोक मुलगा झाला की स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते , ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत असतात.. एरवी तीन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्या वरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक नंतर सुधारण्यात काही उपयोग नसतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp