



आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,देवणी येथे रासिकोत्सव-2023 उत्साहात साजरा
देवणी येथील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर , तहसीलदार गजाननजी शिंदे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, गट शिक्षण अधिकारी संजय सिंदाळकर , संस्थेचे सचिव गजाननजी भोपणीकर, इस्माईल शेख, चेअरमन रतन गरड, जाफर मोमीन, विनायक कांबळे, कै रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे व उपप्राचार्य डॉ शिवाजीराव सोनटक्के इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते रसिकोत्सव 2023 या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यातआले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यू कॉलेज चे प्राचार्य राहुल बालुरे यांनी मांडले. देवणी तालुक्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी स्वतः मी या शाळेचा पालक आहे असे वक्तव्य करत शाळेचे कौतुक केले वकार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिले.सोनाली कांबळे यांनी पालक प्रतिनिधी म्हणुन आपले शालेविषयीचे सकारात्मक विचार समोर मांडले.कार्यक्रमास पत्रकार प्रताप कोयले, देविदास पतंगे, प्रमोद लासोने,गिरिधर गायकवाड, जाकिर बागवान, प्रशांत घोलपे, प्रीतम अष्टुरे,अंकुश माने,बालाजी कवठाळे, कृष्णा पिंजरे,इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन रसिकोत्सव 2023 द ॲन्युअल डे या नावाने साजरा करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी बालगीते ,लोकगीते, भारुड, लावणी, इत्यादीवर नृत्य सादर करून पालकांची व रसिकांची मने जिंकली. जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी या संस्थेच्या वतीने आबासाहेब इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राहुल बालुरे , उप प्राचार्य रामदास नागराळे यांचा सत्कार करण्यात आला.
अप्रतिम अशा वार्षिक स्नेहसंमेलनाचे म्हणजेच रसिकोत्सव 2023 द ॲन्युअल डे या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे अध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर व संस्थेचे सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे प्रमुख सुप्रिया कांबळे,लीड को ऑर्डीनेटर क्षेमानंद कन्नाडे, मंजुनाथ कन्नाडे,रणजीत गायकवाड, स्वाती कोयले, उमेश अंबेनगरे, नियाज मुहंमद, पवार उमाकांत,अनंत बिरादार, व तसेच विजयकुमार भोजणे , डॉ सत्यवान सोनटक्के,विक्रम गायकवाड, ममता कंठे, अनुसया हडबे, जनाबाई हडबे,प्रतीक्षा सूर्यवंशी, जयश्री माने,सबा सय्यद , नेहा शेख, सुवर्णा सोनटक्के, रागिणी सुर्यवंशी, सोनाली बिरादार,
इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा लोकरे, साक्षी हुळे व आभार सुप्रिया कांबळे यांनी केले व या अतुलनीय कार्यक्रमाचा सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले. या कार्यक्रमास देवणी पंचक्रोषीतील व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी ,पालक व इतर रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती व तसेच रसिकांनी या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिले.