देवणी /प्रतिनिधी : शैक्षिणक वर्ष 2023-2024 अतंर्गत आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज देवणी या शाळेने शासनाने राबवलेल्या “मुख्यमंत्री” माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत देवणी तालुक्यातून सर्व तृतीय क्रमांक प्राप्त केला असून एक लाख पारितोषिकाची शाळा मानकरी ठरली आहे . या शाळेची स्थापना सन 2013 ची आहे .सदरील संस्था ही ग्रामीण भागातील उत्कृष्ट संस्था म्हणून नावारूपाला आली आहे ,देवणी तालुक्यातील 1 ली ते 12 वी पर्यंतीची इंग्रजी माध्यम शाळा आहे . देवणी तालुक्यातील प्रथम डिजिटल शिक्षण देणारी ही संस्था आहे .ग्रामीण भागातील सर्वसामान्य असलेले शेतकरी कुटुंबातील मुला -मुलींना देवणी तालुक्यात उत्तम इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या या संस्थेचे एका मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालेले दिसून येत आहे . या विद्यालयात 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत इतर तालुक्यातील मुलांना या शाळेत शिकता यावं याचा विचार करून आबासाहेब निवासी वसिगृह चालू करण्यात आले या वसतिगृहात 300 मुले निवासी असून या निवासी वसतिगृहात पुणे, गुजरात , केरळ तसेच निलंगा औसा ,उस्मानाबाद, उदगीर ,शिरूर अंतपाळ आणि देवणी तालुक्यातील जवळपास अनेक खेड्यातील मुले इथे निवासी आहेत त्या मुलांना नाईट क्लासेस , कराटे क्लासेस स्पोकन क्लासेस ची सुविधा आहे. या विद्यालयात विविध स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली जाते व अनेक स्पर्धा परीक्षेत मुलांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. शिक्षणासोबत च क्रीडा क्षेत्रात ही शाळेने अनेक स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर क्रमांक फटकावून विद्यार्थी राज्यस्तरावर पोहचले आहेत .ही एक उप्रकमशिल शाळा आहे नेहमी कोणताही उपक्रम घेण्यास सक्रिय असते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही शाळा नेहमी तत्पर असते. मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमातही विद्यालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक सामाजिक स्वच्छता, विषयक तसेच पर्यावरण पूरक इतर सर्व 30 बाबींचे मूल्यांकन ‘मूल्यांकन समितीद्वारे’ परीक्षण करण्यात आले होते. या सर्व बाबींचे अहवाल, छायाचित्रे, अभिलेख शाळेचे संस्था सचिव मा.गजानन भोपणीकर यांच्या मार्गर्शनाखाली प्राचार्य राहुल बालुरे यांच्या नेतृत्वाने शाळेतील सर्व शिक्षक वर्गाने केले म्हणून शाळेला हे यश प्राप्त झाले . शाळेच्या यशा बद्दल संस्था अध्यक्ष मा. गोविंदरावजी भोपणीकर साहेब , संस्था सचिव मा. गजानन भोपणीकर ,शिक्षणाधिकारी नागेश मापारी, वंदना फुटाणे ,गटशिक्षण अधिकारी संजय शिंदाळकर, विस्तार अधिकारी शिरीष रोडगे, केंद्रप्रमुख किशनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्राचार्य राहुल बालूरे , उपप्राचार्य रामदास नगराळे , शाळा व्यवस्थापिका सुप्रिया कांबळे, लीड समन्वयक क्षेमानंद कन्नडे यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्या अथक परिश्रमामुळे शाळेला यश प्राप्त झाले व सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp