उदगीर / प्रतिनिधी : एस.टी.महामंडळ कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनात विलनीकरण करून राज्य शासनाचा दर्जा द्यावा व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सवलती व महागाई भत्ता देण्यात यावे आदी मागण्या संदर्भात
संयुक्त कृती समितीच्या विभागीय पातळीवरील बेमुदत उपोषणाला आज गुरुवारी (ता.२८) उदगीर आगाराच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आंदोलनाला सुरुवात करण्यात आले आहे.
एस.टी.महामंडळ कर्मचारी यांची आनेक वर्षांपासून लावून धरलेली मागणी महाराष्ट्र शासनात विलनीकरण करून राज्य शासनाचा दर्जा द्यावा व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवा सवलती व महागाई भत्ता देण्यात यावे आदी मागण्या संदर्भात बेमुदत अंदोलनाला सुरुवात करण्यात आले आहे.
या वेळी आंदोलनात इंटकचे सचिव के.जे.सांगवीकर कामगार संघटनेचे अध्यक्ष राहुल धनाश्री, एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उमाकांत दोडके, कामगार सेनेचे सचिव बाबुराव दिंडे, नामदेव पवळे, सचिन पटवारी, शेख रफीक, उद्धव कांबळे, अमित बनसोडे, सुधीर गरड, मरेवाड अनिल,बालाजी कांबळे आदींसह अनेक कर्मचारी उपस्थित होते. या उपोषणात आंदोलकांनी मागण्यांचे घोषनाही देत होते.एसटी कर्मचाऱ्यांनी आचानक केलेल्या आंदोलनामुळे प्रवासी वर्गाला ना हाक त्रास सहन करावा लागत आहे. आनेक प्रवासी हैराण होत खाजगी वाहनांचा आसरा घेत आसल्याचे चित्र रस्त्यावर दिसत होते.