ऑल इंडिया पँथर सेनेचा – मी पँथर सवांद मेळावा व अनेक ठिकाणी शाखेचे अनावरण सोहळा संपन्न..
देवणी / प्रतिनिधी : ऑल इंडिया पँथर सेनेचा मी पँथर संवाद मेळावा घेण्यात आला व त्याच दिवशी मौजे कानेगव, सय्यदपुर,अच्वला, नेकणाळ,तळेगाव,नागराळ, वलांडी,येथे शाखेचे अनावरण करण्यात आले होते व त्या अनावरण सोहळ्यास ग्रामीण भागात भरपूर प्रतिसाद दिल्याचे दिसून येते व यासाठी तालुक्यातील अनेक तरुण पिढी संघटन मजबूत करण्यास प्रतिसाद दिला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी तुरून पिढीला संबोधताना म्हणाले की,
लातूर जिल्ह्यात पँथर वादळ…
गावा गावात शाखा स्थापना सुरू आहे. लातूर दौऱ्यावर असतांना ठिकठिकाणी जाहीर सभा संपन्न झाल्या. ऑल इंडिया पँथर सेनेची लढाऊ भूमिका दलितांनी अंगिकारली असून माझा दलीत समाज, माझ्यासाठी लढणारा स्वाभिमानी आंबेडकरी कार्यकर्ता ओळखायला समाजाने सुरवात केली आहे. मी जे रुजवायला निघालोय ते जर रुजलं तर महाराष्ट्रात नवी क्रांती उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने दलीत बारकाईने आमच्याकडे विश्वासाने पाहत आहेत, त्यांच्या डोळ्यात परिवर्तनाची चाहूल दिसु लागली आहे, चळवळीवरील प्रेम दिसू लागले आहे!
लातूर दौरा अफाट मंतररलेला, झंझावाती दौरा होता. लातूरमध्ये पँथर क्रांती होणारच… व जर यापुढे जर कोठे दलीत शोषित यावर अन्याय अत्याचार झाला तर ही संघटना शांत बसणार नाही तर लाखो पँथर रस्त्यावर येऊन आंदोलन छेडल्याशिवाय बसणार नाही व न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर प्रयत्न करीन या कार्यक्रमात संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे, जिल्हाध्यक्ष कुणाल इंगळे,जिल्हा प्रभारी शिरीषकुमार सूर्यवंशी, संगीता कांबळे अजय शिंदे, भैय्यासाहेब देवणीकर,शिवाजी कांबळे, अक्षय शिंदे,विक्रम इसाले, श्रीमंत शिंडखेडे,अमोल सूर्यवंशी,शिवाजी गायकवाड, यशोदिप जाधव,तुकाराम कांबळे रत्नदीप ,प्रतीक,संदीप गायकवाड, शामलाल सूर्यवंशी,बालाजी गायकवाड, धम्मानंद, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन देवणी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, उपाध्यक्ष रविकिरण कांबळे व युवा तालुकाध्यक्ष डॉ,संभाजी कांबळे व सेनचे पदाधिकारी यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन शिंदे यांनी मानले.