कै. रसिका महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देवणी
जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान, भोपणी द्वारा संचलित कै. रसिका महाविद्यालय देवणी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रा. मल्हारी कांबळे ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, जळकोट) यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील व आबासाहेब इंग्लिश स्कूलमधील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

