राहुरी / प्रतिनिधी : तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या चिखलठाण गावातील सांडपाणी व्यवस्थापनाचा बोजवारा निष्काळजीपणाने आजाराला निमंत्रण देत आहे. सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. साथीच्या रोगाने थैमान घातलेल्या आजाराला थांबत नाही ,तेच आनखी त्यामध्यें भर पडून सांडपाण्याच्या (दुषित पाणी,गटाराचे पाणी,धूण्याचे पाणी,पाळीव जनावराचे मल मूत्र,इत्यादि )चुकीच्या व्यवस्थापनेमूळे आणखी आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.चिखलठाण गावात अंगणवाडी,जिल्हा परिषद शाळा,ग्रामपंचायतीची ईमारत आहे.या गावात शालेय मुले,पालक ,आदि ग्राहक,प्रवासी येथून रहदारी (दळणवळण) करतात .या रस्त्यावरच्या सांडपाण्याने डेंगू,मच्छर,डासाचे प्रमाण वाढून शालेय विद्यार्थी, आजारी पडली तर याला जबाबदार कोण?असा सवाल जनतेकडून व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतींन दिलेल्या गल्लोगली पाणी नळ कनेक्शन उपलब्ध करून दिलेले आहे, परंतू त्याचा वापर चूकीच्या पद्धतीचा होत असेल तर नळ कनेकशन पंचायतीने बंद करावे जे न करून या सांडपाणी व्यवस्थापनाचा बोजवारा निष्काळजीपणाने करणाऱ्यांना चाप बसेल.अशी मागणी नागरिक करत आहे.माजी सरपंच किसनराव काळनर,मच्छिंद्र काळनर,ईसाक सैय्यद(राहुरी तालूका उपाध्यक्ष राष्ट्रवादी) डोमाळे विजय,काकडे संजय, बागुल अभि,राहुरी तालूका पत्रकार शेख युनुस आदी उपस्थित या विषयावर चर्चा करून चिखलठाण गावातील सांडपाणी व्यवस्थापनाचा बोजवारा काळजीपूर्वक सूरळीत करण्यात ग्रामपंचायतीने कटिबध्द राहुन सांडपाणी सुरळीत नियोजनबद्ध पुर्ण करावा.अशी मागणी नागरिक करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp