बार्टी येरवडा येथे यूपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार…
बार्टी येरवडा येथे यूपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार. ——————————————————- पुणे : दिनांक 29सप्टेंबर (प्रतिनिधी) कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी कष्टाची पराकष्टा करून मेहनत घेतली,यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020यश मिळविले, या यशाने तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले.या संविधानाची अंमलबजावणी करून महामानवाचा विचार पुढे न्यावे तसेच उच्च पदावर विराजमान झालो तरी आदर्शवाद जपला पाहिजे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत अनुसूचित जातीचा टक्का वाढावा म्हणून बार्टी येरवडा येथे यूपीएससी निवासी प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करणार आहोत व यूपीएससी 2020 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मा. श्री. धनंजय मुंडे, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे असे प्रतिपादन श्री धम्मज्योती गजभिये,महासंचालक बार्टी पुणे यांनी व्यक्त केले . सोमवार दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी बार्टी, पुणे येथील सभागृहामध्ये बार्टी पुरस्कृतव यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2020 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा श्री धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री मुकुल कुलकर्णी IRS,(उपायुक्त इन्कमटॅक्स पुणे), व श्री रुपेश शेवाळे IRS (उपायुक्त इन्कम टॅक्स पुणे) हे उपस्थित होते . यु पी एस सी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी श्री शरण कांबळे (AIR 542)व श्री अजिंक्य विद्यागर (AIR 617)यांचा सत्कार व पाहुण्यांचा सत्कार श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे यांच्याहस्ते करण्यात आला. सत्कारमूर्तींना व पाहुण्यांना भारताचे संविधान, महामानव, सर्वोत्तम भूमिपुत्र -गौतम बुद्ध हे पुस्तक भेट देण्यात आले. श्री शरण कांबळे, श्री अजिंक्य विद्यागरया विद्यार्थ्यांनी आमचे प्रेरणास्थान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असून त्यांचा वारसा व प्रेरणा घेऊन आम्ही समाजासाठी व बार्टीसाठी काम करू असा मनोदय व्यक्त केला. तसेच आम्ही बार्टीने संस्थेने केलेल्या मदतीमुळे व मुलाखतीचे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झाल्याचे सांगितले. मुलाखतीच्यापूर्वतयारी प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकाऱ्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन दिले. विद्यार्थ्यांचे तीन मॉक इंटरव्ह्यु घेण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्याद्वारे एकमेकांची मुलाखत घेतली व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पॅनलद्वारे मुलाखत घेण्यात आली. दि. 10 मे 2021 रोजी श्री प्रशांत नारनवरे, आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभाग, पुणे यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनपर व्याख्यानातून पूर्वतयारी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. श्री. मुकुल कुलकर्णी व श्री. रुपेश शेवाळे यांनी सदर प्रशिक्षणाची रूपरेषा तयार केली होती. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत उमेदवारांनी बार्टी संस्थेचे आभार मानले आहे. श्री सुहास गाडे, श्री स्वप्नील निसर्गन,श्री पियुष मडके या यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सत्कार सोहळ्यात ऑनलाइनद्वारे उपस्थित राहिले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कर्तृत्वामुळेच आज आम्ही यशस्वी झालो असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्री स्वप्नील निसर्गन या विद्यार्थ्याने सांगितले व मा. महासंचालक व बार्टी यांचे आभार व्यक्त केले. श्री रुपेश शेवाळे ,IRS व श्री मुकुंद कुलकर्णी IRS यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यास बार्टीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सत्कारसोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया पवार, प्रकल्प अधिकारी यांनी केले आणि श्री उमेश सोनवणे, विभाग प्रमुख, योजना विभाग बार्टी पुणे यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मानले .