ज्येष्ठ दिनानिमित्त नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न
उदगीर : दि.१ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त इनरव्हील क्लब उदगीर तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या मोफत शिबिरासाठी ओमसाई नेत्रालयचे १५ वर्षापासून सेवा देणारे प्रसिद्ध डॉ. दयानंद निजवंते यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात २५ लोकांनी याचा लाभ घेतला. डॉ. निजवंते सरांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल त्यांचा इनरव्हील क्लब उदगीर तर्फे सपत्निक सत्कार करण्यात आला. या शिबिराच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष मीरा चंबुले, सचिव शिल्पा बंडे, उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, सह सचिव नीलिमा पारसेवार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, आयएसओ स्नेहा चणगे , एडिटर पल्लवी मुक्कावार, शकुंतला पाटील, वैशाली सूर्यवंशी व रेणुका निजवंते यांचे सहकार्य लाभले.
.