डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याची रिपाइंच्या वतीने मागणी
देवणी / प्रतिनिधी : वलांडी तालुका देवणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा समाज बांधवांनी 1984 मध्ये बौद्ध वस्तीत बसवला असून तो पुर्णाकृती व्हावा यासाठी प्रयत्न केला जात आहे, तसेच समाज मंदीर जीर्ण झालेले आहे त्याचेही बांधकाम करावे ,समाजमंदिराच्या चहू बाजूनी मोकळ्या जागेला संरक्षण भीत कंपाउंड करावे कारण मागील बाजूस घाणीचे साम्राज्य होत आहे याला तात्काळ आळा घालावा अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने मा ग्रामविस्तार अधिकारी केंद्रे साहेब ग्रामपंचायत कार्यालय वलांडी तालुका देवणी यांना मागणीचे निवेदन समाज बांधवांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.. यावेळी विलास वाघमारे रिपाई , मुकेश कांबळे स्वाभिमान युवा मंच सस्थापक अध्यक्ष , पप्पू बनसोडे, नितीन वाघमारे स्वाभिमान युवा मंच सचिव , धोंडीराम गायकवाड, नरेंद्र बनसोडे, राहुल बनसोडे, विठ्ठल बनसोडे, वैजनाथ बनसोडे, भुजग बनसोडे, विकास बनसोडे, प्रकाश कांबळे, अनिल मोदाळे, व इतर समाज बांधवांच्या स्वाक्षरीने देण्यात आले