गंगाखेड / प्रतिनिधी (प्रा.एम.एम.सुरनर) दि. १५ तथागत नगर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर तथागत भगवान गौतम बुद्ध व माहमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प-पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. उपस्थीतांनी त्रिशरण पंचशी ग्रहान करुण या प्रसंगी वक्त्यानी अनुप्रवर्तन महत्व विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. विलासराव जंगले (आण्णा) जेष्ठ समाजसेवक ससेच प्रमुख पाहुणे म्हणुन नगर सेवक तुकाराम तांदळे , नगर सेवक प्रमोद मस्के , सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळवे , एम.बी. गोटमुकले , दुर्गानंद वाळवंटे, राहूल गायकवाड , आबासाहेब उपाडे तसेच माधवराव सावंत , सिताराम जगले , पैठणे बाबा , वैजनाथ शिंदे ,नवनाथ खंदारे , वैजेनाथ मुजमुले , व्यंकटभाऊ मुंडे ,लिंबाजी मस्के यांच्यासह विमलबाई सावंत , लक्ष्मीबाई कांबळे , शिलाबाई वाळवंटे, राधाबाई मस्के , मथुराबाई देवरे , रंजनाताई तुपे, सोनाली गोदाम , प्रज्ञाताई कदम , कुसुमताई मुंडे , आस्मिता ठोके , प्रियंका सरवदे, प्रज्ञा देवरे, संध्याताई जगतकर, उषा गायकवाड , पैठणे ताई ,मिराताई व्हावळे , नंदीनी गायकवाड , दिव्या गोदाम, संबोधी ठोके , सानु सावंत मोण्या संख्येने महिला भगीणीची उपस्थीती होती. कार्यक्रम यशस्वीते साठी रावसाहेब मस्के, उमेश तुपे , गौतम कदम, मेघानंद गोदाम , माणिकराव शिंदे मधुकर जोंधळे , सुशिल सावंत , सिद्धार्थ कांबळे , राजरत्न देवरे , दिलिप पैठणे , लक्ष्मण व्हावळे आणि प्रतिक कदम , प्रशिक व्हावळे , कल्याण , प्रदिप कदम, नैतिक व्हावळे, हार्ष कदम , प्रशांत जोंधळे , सुमेध गोदाम , उत्कर्ष तुपे , दक्ष मस्के, आशु देवरे आदी बालकांचा उस्फुर्त सहभाग नोंदवीला.

॥ झाकली कधीना जयाने लाज ॥
॥फेकले वस्त्र ते आम्ही आज ॥
हे समर्पक गीत प्रा. भगवान गायकवाड सर यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर केले.
आणि २२ प्रतिज्ञा चे वाचन करण्यात अले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण व्हावळे यांनी तर आभार प्रदर्शन रावसाहेब मस्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp