दृष्टीहीनांना दृष्टी देणाऱ्या डॉ.ज्योती सोमवंशी
उदगीर येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ञा डॉ.ज्योती दिपक सोमवंशी यांचा दिपज्योती डोळ्याचा दवाखाना कॅ. कृष्णकांत चौकातून नाईक चौक , निडेबन रोड उदगीर येथे स्वतःच्या जागेत आज स्थलांतरीत होत आहे.त्यानिमित्त डॉ.ज्योती सोमवंशी यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख ... डॉ.ज्योती दिपक सोमवंशी हया गेल्या अनेक वर्षांपासून विविध हॉस्पीटलच्या माध्यमातून नेत्रशस्त्रक्रिया करून दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचे काम केले. अनेक ठिकाणी सेवा बजावत त्या २००९ मध्ये उदगीर येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयात नेत्रतज्ञा म्हणून रुजू झाल्या . तेथे अनेकवर्षं सेवा बजावल्यानंतर १० मार्च २०१८ रोजी स्वतःचे दिपज्योती नेत्र रुग्णालय सुरू करून नेत्र रुग्णांची सेवा करण्यास प्रारंभ केला.त्यांनी नेत्रहिनाना दृष्टी देण्याचे काम केले.मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू शस्त्रक्रिया, फेको शस्त्रक्रिया अशा हजारो नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या आहेत.डोळ्याच्या त्रासामुळे रुग्णालयात आलेल्या वयस्कर पुरुष महिला व बाल रुग्णावर संवादाच्या माध्यमातून अर्धा आजार कमी करण्याची त्यांची शैली चांगली आहे. रुग्णाची आस्थेवाईकपणे चौकशी करून उपचाराने डोळ्याचा त्रास कमी होईल,काळजी करू नका असा धीर देणे, त्यांच्यावर चांगल्या पध्दतीने शस्त्रक्रिया करणे,औषधपाणी वेळेवर घेण्यास सांगणे अशा आपुलकीने उपचार केल्यानंतर रुग्ण रुग्णालय सोडून जाताना त्यांना आशीर्वाद देवून न गेला तर नवलच ! डॉ.ज्योती सोमवंशी यांनी आव्हानात्मक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्याचे काम केले आहे.डॉ.ज्योती सोमवंशी यांनी हजारो नेत्रशस्त्रक्रिया शिबीरात शस्त्रक्रिया केल्या आहेत. नेत्रशस्त्रक्रियेच्या माध्यमातून उदगीर-देवणी-जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागात शिबीरे घेवून त्यांनी रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया केल्या आहेत.गतवर्षी जळकोट तालुक्यातील एक आठ महिन्याच्या अंध बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करून दृष्टी देण्याचे काम केले.आपलं बाळ जन्मताच अंध आहे ते हे जग पाहू शकणार नाही या विचाराने त्या बाळाचे आई-वडील दुःखी होती पण जेव्हा डॉ.ज्योती सोमवंशी यांनी त्या बळावर शस्त्रक्रिया केली तेव्हा ते बाळ टकटक पाहत होते आणि त्यांच्या आई-वडीलाला आश्चर्याचा धक्काच बसला .त्यांनी मनोमन डॉ.सोमवंशी मॅडमला धन्यवाद व आशीर्वाद देवून निघून गेले.डॉ.ज्योती सोमवंशी याना त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचे पती सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ.दिपक सोमवंशी हे सहकार्य करीत असतात. जीवनात डॉ. दिपक सोमवंशी याना आदर्श मानणाऱ्या डॉ.ज्योती सोमवंशी याना आगामी काळात गोरगरीब , सामान्य रुग्णावर आधुनिक पध्दतीने नेत्रचिकित्सा व नेत्रशस्त्रक्रिया करायची आहे.माफक दरात गोरगरीब जनतेला सेवाभावीवृतीने सेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. आज याप्रसंगी त्यांचे शुभसंकल्प यशस्वी होवोत ही सदिच्छा ...! शंकर बोईनवाड पत्रकार उदगीर