देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी देवणीत सकल मराठा समाज देवणीच्या वतीने शनिवारी देवणीत चक्कजाम रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. मात्र मराठा आंदोलक व मनोज जरांगे पाटील यांना हे मराठा समाजाला मान्य नसून त्यांनी मराठ्यांना कुणबी म्हणूनच आरक्षण द्यावे व तसेच सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. याच मागणीसाठी शुक्रवारी प्रशासनाला सकल मराठा समाज देवणीच्या वतीने निवेदन दिनांक २४ ते २९ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी दहा ते एक व सायंकाळी चार ते सात यादरम्यान रस्ता रोको चक्कजाम आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले होते त्यानुसार शनिवारी (दि.२४ ) रोजी सकाळी देवणीत ११ ते १ यावेळेत देवणीत येथे निलंगा – उदगीर रोडवर चक्कजाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या निलंगा उदगीर रोडवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे दिसून आले .विद्यार्थी आणि अँब्युलन्सला अडचण होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घेतलेली दिसुन आली. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आले. यावेळी आंदोलन स्थळी देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे उपस्थित राहुन प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.
चौकट..
उद्या रास्ता रोको नाही..
सकल मराठा समाज देवणीच्या वतीने दिनांक दिनांक २४ ते २९ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी दहा ते एक व सायंकाळी चार ते सात यादरम्यान रस्ता रोको चक्कजाम आंदोलनाबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते मात्र (दि,२५) रोजी अंतरवाली सरासरी येथे होणाऱ्या बैठकीनंतर आंदोलनाचा पुढील निर्णय घेतला जाईल असे सकल मराठा समाजाच्या नियोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला. रविवारी (दि.२५)तोगरी क्रॉस येथे होणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.