देवणी तालुका काँग्रेस पक्षातील लिडिंग लिडर निष्क्रीय, निष्फळ ! राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढले बळ ?
देवणी दि 2 ऑक्टोबर : तालुक्यातील विविध प्रकारच्या प्रशासकीय समित्यामुळे काँग्रेस पक्षात कमालीचे मतभेद वाढले असून काँग्रेस पक्षात लीड करणारे नेते कार्यकर्ते यांच्यात कमालीची अस्वस्थता, मरगळ अली असून तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे असलेले अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अस्तित्वासाठी धावपळ करीत असताना दिसत आहे यांचे एकमेव उदा म्हणजे देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हे होय
देवणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने विविध प्रशासकीय समितीवर आपल्याशी व्यक्तीनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून कोणत्याही पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांची नावे शिफारस केली गेली त्यामुळेच कॉंग्रेस पक्षातील बऱ्याच जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मने दुखावली गेली त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील नेते व कार्यकर्ते यांच्यातील दरी वाढतच गेली गट तट व मतभेद व मनभेद वाढले यांचा पुरेपूर फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांढऱ्या शुभ्र बगळया सारखे शिकारीच्या शोधात तळ्याकाठी बसलेल्या बगळ्याची भूमिका बजावली शिकार आल्याचे कळताच देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर झडप घातली आखी समिती आपल्या गळ्यात घातली आमचं तालुक्यात अस्तित्व कमी असले तरी काय झाले ” हम किसींसे कम नहीं ” हे आपल्या कृतीतून दाखवून दिले
देवणी तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यकिर्दीत हा उपेक्षित राहिला आहे या पूर्वीच्या हेर मतदारसंघाला म्हणावं तेव्हडे विकासाचे योगदान राहिले नाही हे तितकेच खरे असले तरी स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाना विसरता येत नाही पूर्वीचा हेर मतदारसंघ स्वर्गीय विलासराव देशमुख व स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या मित्रप्रेमच्या वाटाघाटीत देवणी तालुका हा कायम स्व गोपीनाथ राव मुंडे यांच्या अधिपत्याखाली राहिला स्व विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होऊनही एकमेकांच्या इलाख्यात काही हस्तक्षेप करायचा नाही असा अलिखित करार झाल्याने भाजपा च्या अधिपत्याखाली असलेल्या हेर मतदारसंघाला काहीही भेटले नाही तालुका अखेर विकासापासून उपेक्षित राहिला परंतु अलिकडील काळात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सहकाराच्या माध्यमातून लोकांच्या हिताचा जागृती सहकारी साखर कारखाना व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका च्या माध्यमातून काम करून देवणी तालुक्यात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याचे काम केले याच तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तन मन धनाने नाव लौकिक मिळवलेले भोपणीकर, नागराळकर , विलेगावकर ,विजयनगर कर अशी मोठी घराणे आहेत केवळ यांचे गाव फक्त देवणी तालुक्यात आहेत कार्यक्षेत्र मात्र इतर ठिकाणी आहे यांच्या ताब्यात कोणतीच स्वराज्य संस्था नाही सध्या ग्रामपंचायती सुद्धा यांच्या ताब्यात नाहीत भोपणी ची ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे नागराळची ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असली तरी सरपंच मात्र कट्टर शिवसैनिक आहे विजयनगर ची ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे विलेगाव येथील ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाकडे ठेवण्यात यश मिळवले आहे या काँग्रेस पक्षात असलेल्या बलाढ्य घराण्यांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरले आहेत कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून यांना यश मिळवता आले नसताना पक्षाच्या माध्यमातून प्रशासक म्हणून खैराती सारख्या मिळणाऱ्या पदासाठी दत्त म्हणून देशमुखांच्या दारात उभेंच आहेत म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबर प्रेम करणाऱ्या तळागाळात काँग्रेस पक्षाच्या नावावर वीस वीस वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे पक्षश्रेठी म्हणून कोणी या निष्ठावंताकडे पाहणार आहे की नाय का असेच होत राहणार हाय ही मोजकी घरे म्हणजे देवणी तालुक्यातील कांग्रेस आहे काय असा निष्ठवंतांना प्रश्न पडला असून सर्विकडे नाराजीचा सूर आहे प्रशासक पदासाठी इतकी ओढाओढ चालू आहे देवणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकवरून दिसून येथे काँग्रेस पक्षातील नेत्याने पक्ष निष्ठ कार्यकर्यापेक्षा व्यक्तिनिष्ठ कार्यकर्ते यांना प्राधान्य दिले त्यामुळे काँग्रेस मधील निष्ठावंत कार्यकर्त्यात गोंधळ उडाला यांचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपली घडी अलगत काँग्रेस पक्षाच्या हातात बांधून हळुवार कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यभार हाती घेतला शिवसेनेचा निपचित पडलेला वाघ जागा झाला आपल्यावर अन्याय झाल्याची आरोळी मारली मुख्यमंत्री पदावर असलेल्या वाघाने देवणी तालुक्यातील शिवसैनिकाची आरोळी ऐकली आपले चार शिवसैनिक देवणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी सोडले आत्ता एकूण सर्वच पक्षाच्या एकोणिस लोकप्रतिनिधी यांची प्रशासक म्हणून वर्णी लागली आहे आत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासकला बसण्यासाठी खुर्च्या मात्र वाढवाव्या लागणार आहेत हे मात्र निश्चित…….!
गिरीधर गायकवाड