देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे.
या अन्वये आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी करण्यात येत आहे.
त्यानुसार वरील अहर्ता दिनांकास ज्या व्यक्तीस वयाची अठरा वर्षे पूर्ण होतील त्यांची नव्याने मतदार नोंदणी करावयाची आहे.
तसेच या मतदार यादी मध्ये असलेल्या मयत, स्थलांतरित व दुबार नावे असलेल्या व्यक्ती संदर्भात स्वतःहून वगळणी करणे अथवा एखाद्याच्या नावास आक्षेप घेणे, मतदाराला स्वतःच्या नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे, एका यादी भागातून दुसऱ्या यादी भागात नाव समाविष्ट करणे, ही कामे करण्यात येणार आहेत.
यासाठी दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 30 नोव्हेंबर पर्यंत आहे.
या प्राप्त झालेले दावे व हरकती 20 डिसेंबर पर्यंत निकालात काढल्या जातील.
सदरची यादी ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम प्रसिद्ध होणार असून संभाव्य जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे.
तरी प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची शंका असल्यास आपल्या यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आसे आवाहन सुरेश घोळवे तहसीलदार देवणी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp