नगराध्यक्षपदी डॉ. किर्ती घोरपडे तर उपनगराध्यक्षपदी अमित मानकरी बिनविरोध
देवणी / प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील बहुचर्चित देवणी नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आसून देवणी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी डॉ.किर्ती घोरपडे तर उपनगराध्यक्षपदी अमित मानकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी (ता.०९) झालेल्या निवडसभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.
नगरपंचायत मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने नगराध्यक्ष पदासाठी डॉ. किर्ती घोरपडे यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी अमित मानकरी यांचे एकमात्र नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने या दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी देवणी नगरपंचायतच्या वतीने नुतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. या निवड प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शोभा जाधव तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी सुंदर बोंदर तर पोलिस उपनिरीक्षक मौजुद शेख यानी पोलिस बंदोबस्त चौख ठेवले होते. या वेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व इतर पदाधिकारी व सामान्य जनताही उपस्थित होते.