देवणी पंचायत समितीत प्रशासकीय कर्मचारी बदल्या संदर्भात नियमाचे उल्लंघन करून एकाच ठिकाणी आठ आठ वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर मुख्यकार्यकारी मेहरबान! का? कर्मचाऱ्यात भ्रष्टाचार व अरेरावी वाढली तात्काळ बदल्या कराव्या

देवणी : लातूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे देवणी पंचायत समितीतील कर्मचारी अधिकारी यांच्याकडे लक्ष नसल्याने काही कर्मचारी एकाच आस्थापनेत आठ आठ वर्षे कार्यरत आहेत त्यामुळे त्या त्या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व विविध कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांसोबत अरेरावी वाढली आहे जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाने एकाच ठिकाणी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची तात्काळ जिल्हा बदली करावी अशी मागणी होत आहे
सविस्तर माहिती अशी की
जिल्हा परिषद कर्मचारी बदली अधिनियम 2005 नुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा एका पदावरील कामकाजाचा 3 वर्षाचा सामान्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधिताची सर्वसाधारण बदली करण्यात येते नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी नुसार बदली प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतात जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या बदल्या बाबद काही नियम आहेत या नियमाचे पालन करून जिल्हा परिषदेच्या बदल्या केल्या जातात परंतु लातूर जिल्हा परिषदसामान्य प्रशासन विभागाचे देवणी पंचायत समितीच्या कर्मचारीअधिकारी यांच्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी मात्र मेहरबान आहेत त्यामुळं देवणी पंचायत समितीत एक एक कर्मचारी एका एका पदावर एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत त्यामुळे त्यांच्यात अरेरावी वृत्ती भ्रष्टाचार करण्याचे मनोबल वाढले आहे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी देवणी पंचायत समितीतील प्रत्येक आस्थापनेच्या कर्मचारी अधिकारी यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे आहे तात्काळ बदल्याचे आदेश निर्गमित करावे अशी मागणी होत आहे
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडडणुका झाल्या नसल्याने कर्मचारी अधिकारी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सह कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या विविध पदाधिकारी समित्या नाहीत पंचायत समितीला सभापती /उपसभापती नाही त्यामुळे कर्मचारी अधिकारी यांची सर्वसाधारण लोकांच्या सोबत अरेरावी वाढली आहे रोहयो वयक्तिक लाभाच्या योजना विहीर, जनावरचा गोठा, विविध योजनेतील घरकुले, यात लाखो रुपयेची लूट होत आहे रोहयो योजनेतील काही कामे फक्त कागदोपत्री आहेत या संदर्भात कार्यकारी मुख्याधिकारी यांनी काही कर्मचारी याना सेवेतून कार्यमुक्त केले आहे तर पंचायत समितीतील एकात्मिक महिला बाल विकास अधिकारी विस्तार अधिकारी व सकस आहार पुरवठा करणारा ठेकेदार यांनी संगणमत करून तीन महिन्याचा सकस आहार काळ्या बाजारात विकून भ्रष्टाचार केला आहे मुद्रांक शुल्क तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत अधिकारी याना हाताशी धरून टक्केवारी घेऊन वाटप करण्यात आला आहे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत दौरे दाखवून कोणत्याही ग्रामपंचायतीला न जाता प्रवास भाडे दाखवून शासनाची लूट केली जात आहे कर्मचारी मुख्यालयी राहणे सर्वाना बंधनकारक आहे मात्र अपवाद वेगळंता कर्मचारी अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत मात्र मुख्यालयी राहत असल्याचे कागदपत्रे दाखवून शासनाकडून घरभाडे घेतले जात आहेत
पंचायत समिती मार्फत चालणाऱ्या सर्व आस्थापनाची तपासणी आयुक्त कार्यालया मार्फत करण्यात आली वरील सर्व काळे कारनामे लपविण्यासाठी प्रत्येक आस्थापनेतील प्रत्येक कर्मचाऱ्याकडून चंदा एका आस्थापनेतुन दहा हजार रुपये प्रमाणे आयुक्त कार्यालयातील समितीचा आदर सत्कार करून कार्यालयीन तपासणी करून घेतली या कृष्ण कृत्य यावर आर्थिक पांघरून घेऊन तपासणीच्या दुसऱ्याला दिवशी आनंद उत्सव साजरा केलाअश्या भ्रष्ट व एका एका ठिकाणी आठ आठ वर्षे नियमबाह्य प्रशासकीय नोकरी करणाऱ्या देवणी पंचायत समितीतील कर्मचारी या लातूर जिल्हा बदली करा अशी मागणी होत आहे
गिरीधर गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp