देशाचे तुकडे करून देशाला सत्यानाशाकडे नेण्याचा
मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्र – दादासाहेब शेळके
काल परवाच म्हणजे दिनांक 17/ 10/ 2021 रोजी मुंबई येथे गुरु मा कांचन गिरी या हिंदू महिला धर्म गुरू नी या देशाला हिंदू राष्ट्र बनवायचा आहे असे पत्रकाराला बोलताना सांगितले आहे. मुळातच या देशात भाजप सरकार आले तेव्हा पासून जवळ पास प्रत्येकच हिंदू धर्मगुरु (अपवाद सोडून ) भाजप व आर.एस.एस.चि भाषा बोलत आहेत.ते या देशातिल बहुजनाना गुलाम बनविण्यासाठि मनुस्मृती लागु करुन देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठीच भारतिय संविधानाला टार्गेट करणे हे एकमेव ध्येय मनुवादी धर्मगुरूंच आहे. मुळातच देशाला स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर देशाला हिंदू राष्ट्र करण्या संदर्भात चर्चा सुरू झाली तेव्हा कलकत्त्याचे प्रसिद्ध उद्योजक बि.एम. बिर्ला यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री,संविधान सभेचे सदस्य सरदार वल्लभाई पटेल यांना पत्र लिहून सांगितले 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान भारतातून वेगळा झाला व पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक राष्ट्र जाहीर केले आहे.तर भारताला आपण हिंदू राष्ट्र जाहीर करण्यास काय हरकत आहे. तेव्हा बी.एम. बिर्ला यांच्या पत्राला उत्तर देताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले जर आपण भारताला हिंदू राष्ट्र घोषित केले तर पहिल्यांदा आपल्याला काश्मीर वर चा दावा सोडून द्यावा लागेल. या देशाला हिंदू राष्ट्र केले तर हिंदु राष्ट्रात पंजाब, केरळ,मणिपूर,मिझोराम,नागालँड,तामिळनाडू,आंध्र प्रदेश व इतर तीन ते चार राज्ये सामील होणार नाहीत. त्यामुळे देशाचे आठ ते नऊ तुकडे होतील. त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र करणे हे केंव्हाही परवडणार नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार व देशाचे पहिले तत्कालीन कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानि हिंदू राष्ट्राच्या बाबतीत “सेल्स मटेरियल ऑफ डॉ.आंबेडकर”या पुस्तकात खंड क्रमांक 1 पान नंबर 241मध्ये लिहितात देशाला हिंदु राष्ट्र करणे म्हणजे समता,स्वातंत्र्य,बंधुत्व, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीची राख रांगोळी करणे होय. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर “पाकिस्तान ऑफ पर्टिशन ऑफ इंडिया” या ग्रंथातील पान नंबर 338 वर लिहतात या भारताला हिंदु राष्ट्र केले तर या भारताचि तुलना फासीवाद ( मुसोलिनि द्वारा इटली मध्ये सुरू झालेली तानाशाही अर्थात हुकूमशाही) व नाजीवाद (जर्मन हुकुमशहा अडॉल्फ हिटलर यांची विचारधारा) यांच्या सोबत केली जाईल. तसेच या जगामध्ये जे राष्ट्र धर्मावर आधारित झाले आहेत. त्या त्या राष्ट्राची राख रांगोळी झालेली आहे. तसेच या देशाला हिंदु राष्ट्र करण्याच्या बाबतीत आपलं संविधान काय म्हणते सध्याच्या संविधाना नुसार आपला देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तसेच भारतीय संविधान भाग 20 Amendment of the constitution अर्थात संविधानाची सुधारणा आर्टिकल 368 नुसार घटनेत बदल नाही तर संविधान अधिकाधिक चांगले करण्यासाठी संविधानात फेरबदल करण्याची तरतूद आहे. पण देशाला हिंदु राष्ट्र करण्यासाठी सरकारने तसा प्रयत्न केला किंवा हिंदु राष्ट्र करण्यासाठी सुप्रीम कोर्टात तशी कोणी याचिका दाखल केली तर सुप्रिम कोर्ट हिंदु राष्ट्राच्या बाबतीत संविधानात स्पष्ट तरतूद नसल्यामुळें सुप्रीम कोर्ट निर्णय देण्यासाठी संविधानाच्या तिन भागाचा आधार घेते 1) प्रास्ताविका 2 ) राज्यांचि मार्गदर्शक तत्वे 3 ) संविधान सभेत झालेल्या चर्चा debet यांची मदत घेते. तेव्हा वरील विषयाला अनुसरून 24 एप्रिल 1973 ला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सिकरि व 13 जज च्या खंडपीठाने केशवानंद भारति/केरळ राज्य प्रकरणात निर्णय दिला कि सरकारकडे जरि स्पष्ट बहुमत असेल किंवा पैकीच्या पैकी जागा जरी असल्या तरी सरकार संविधानात फेर बदल करत असताना संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर अर्थात मूळ पायाला हात लावू शकत नाही.तसेच धर्मनिरपेक्ष हा बेसिक स्ट्रक्चर चाच भाग असुन जर एखाद्या सरकारने बेसिक स्ट्रक्चर ला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट तो निर्णय घटना बाह्य आहे असे गृहीत धरून रद्द करेल. याचा अर्थ देशाला हिंदु राष्ट्र करणे म्हणजे हे संविधान विरोधी असून अशी मागणी करणे म्हणजे भारताचे तुकडे करून भारताला सत्यानासा कडे नेण्याचा मार्ग म्हणजे हिंदू राष्ट्र होय.तसेच या देशाला हिंदु राष्ट्र करा असे म्हणून इतर धर्मियांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करणे, अल्पसंख्याक धर्मावर दहशत निर्माण करणे व इतर धर्मियांच्या भावना दुखावणे होय.धर्मनिरपेक्षता,एकता, एकात्मता व अखंडता हे बेसिक स्ट्रक्चर चा भाग असून आपल्या देशाला हिंदु राष्ट्र करा म्हणणे म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला तडा जाणे होय.म्हणून राज्य शासनाने अशा जातिवादी व्यक्तींना वेळीच आवर घालून त्यांच्यावर भादवि.124 अ व भादवि.298 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
जय भीम,जय संविधान,जय भारत
दादासाहेब शेळके,राष्ट्रीय अध्यक्ष
भिम टायगर सेना मो.8380886935
टिप: वरील लेखात काही चूक आढळल्यास कृपया
मला कमेंट मध्ये दुरुस्त करावे ही विनंती.