धनेगाव ,गिरकचाळ बंधाऱ्यामुळे २२०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

“उसाच्या क्षेत्रात ३० टक्के वाढ: धनेगाव बंधाऱ्यात ५० टक्के पाणीसाठा”

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीवरील धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यात व गिरकचाळ कोल्हापुरी बंधाऱ्यात ऑक्टोबर मध्ये पूर्ण क्षमतेने जलसाठा केल्याने परिसरातील २२०० हेक्टर जमिनीवरील उन्हाळी हंगामातील पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. यंदा धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यात १००% पाणीसाठा करण्यात आला होता. सध्या धरणात ५.५५ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे या बंधार्‍यावरती गिरकचाळ कोल्हापुरी बंधारा असल्याने दोन्ही बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होणार असल्याची माहिती शाखा अभियंता दत्ता कोल्हे, अजय जोजारे यांनी दिली. त्याचबरोबर परिसरातील सहा गावांना आगामी काळात त पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे. वलांडी परिसरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अनंतवाडी साठवंतलावासह दरेवाडी साठवण तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. उसाचे बेणे महागले असले तरी उसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढून या भागातील उसाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कृष्णा मुंडे कृषी सहाय्यक समाधान इंगळे यांनी दिली.
चौकट: यंदा उसाचे क्षेत्र ३० टक्क्यांनी वाढले…
गतवर्षी तालुक्यात १६,९९१ हेक्टरवर रब्बीचा पेरा करण्यात आला होता यामध्ये ज्वारी २७०९ हेक्टर मका ११६हेक्टर बागायती गहू २५२हेक्टर हरभरा १३१३७ हेक्टर करडी ७५० हेक्टर व इतर गळीत धान्य २३ हेक्टर असा पेरा करण्यात आला होता.तर १३५० हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली होती यावर्षी उसाच्या लागवडीत ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती कृषी अधिकारी कृष्णा मुंडे यांनी दिली.

बंधाऱ्यात ५.५५ दलघमी पाणीसाठा‌यंदा धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यात शंभर टक्के पाणीसाठा करण्यात आला होता. सध्या ५.५५ दलघमी पाणीसाठा असल्याने बंधार्‍यावरती गिरकसाळ कोल्हापुरी बंधारा असल्याने दोन्ही बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

बाष्पीभवन यंत्राचा अभाव..

धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्यातील पाण्याचे किती प्रमाणात बाष्पीभवन होत आहे हे मोजणारे बाष्पीभवन यंत्रच अद्याप पर्यंत बसवण्यात न आल्याने या बंधाऱ्यातील पाण्याचे किती बाष्पीभवन होत आहे यासाठी बाष्पीभवन यंत्र बसवण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp