नवरात्र उत्सवानिमित्त “सामूहिक नवचंडी याग व हवन” सोहळा
उदगीर : भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालिरिती अशा आहेत, ज्या प्राचीन काळापासून सुरू आहेत. गेली अनेक दशके सुरू असल्यामुळे आपण त्या त्याच पद्धतीने पाळतो, साजऱ्या करतो. भारतात धर्म आणि संस्कृतीत वैदिक उपचारांनाही अनन्य साधारण महत्त्व आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार वेदांमध्ये माणसाच्या जन्मापासून ते दशक्रिया विधींपर्यंतचे अनेक उपचार सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना होम-हवन, यज्ञ-याग करण्याची प्रथा, परंपरा आहे. म्हणूनच उदागिर बाबाच्या नगरीमध्ये प्रथमच “सामूहिक नवचंडी याग व हवन” सोहळा याचे आयोजन पुरोहित श्री विजय महाराज यांनी केले आहे.
दि.७ ऑक्टोबर पासून १४ ऑक्टोबर पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे.
-: कार्यक्रमाची रूपरेषा :-
सकाळी :- ०८ ते ०९ अभिषेक व आरती,
०९ ते ११ दुर्गासप्तशतीचा पाठ.
सायंकाळी :- ०६ ते ०७ आरती.
या पद्धतीने श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र,शेटकार इस्टेट देगलूर रोड,उदगीर.येथे संपन्न होत आहे. इच्छुक यजमानांनी आपली नावे नोंदणी करून घ्यावे असे आव्हान पुरोहित श्री विजय महाराज यांनी केले आहे.