निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद दिले
करमाळा तालुक्यातील रावगाव येथील पंडित प्रल्हाद कांबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या महत्त्वपूर्ण सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, फुले शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे चळवळीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पंडित कांबळे गेली वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पूर्ण वेळ काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्ष संघटनेत आत्तापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण पदावर सक्रियपणे व उत्कृष्टपणे काम केले आहे.
पुणे शहराचे 9 वर्ष अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून 9 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात फिरून सामाजिक न्याय विभाग सक्षम केला आहे. गाव, तालुका, जिल्हा, विभाग, पातळीवर मेळावे, प्रशिक्षण, शिबिर, कार्यशाळा, घेऊन उत्कृष्ट संघटना बांधणी केली आहे
शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील वंचित शोषित गोरगरीब नागरिकांना मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण काम केले आहे. तसेच अनुसूचित जातीतील घटकांची बैठक देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व ॲड. जयदेवराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे अनुसूचित जातीमधील 59 घटक जातीच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सातारा येथे भव्य मातंग परिषद आयोजित करून मातंग समाजाच्या समस्या व प्रमुख मागण्यांचा आढावा देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषद आयोजित केली होती.
गेली 20 वर्ष राष्ट्रवादी पक्ष सक्षम व्हावा, बलवान व्हावा म्हणून आपला पूर्ण वेळ देऊन पंडित कांबळे यांनी राष्ट्रवादी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. ह्या योगदानाची दखल घेऊन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय जयंतरावजी पाटील साहेब ॲड.जयदेवराव गायकवाड साहेबांनी प्रामाणिक, निष्ठावंत, अभ्यासू, अशा पंडित कांबळे यांना पक्ष संघटनेतील मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे
या पदाच्या मध्यामातून पक्ष संघटनेचे काम चांगल्या पद्धतीने करून दाखवू व नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावू असा आशावाद कांबळे यांनी व्यक्त केला.