राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांच्या मागणीला यश…!!
देवणी / प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य परिवहन मंञी तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अध्यक्ष मा.ना.श्री.प्रतापसिंहजी सरनाईक यांची मंञालय मुंबई येथे राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी भेट घेऊन बटणपुर- देवणी – होनाळी -येनकी-उदगीर बस दुपारी चार वाजता चालु करण्यात यावेत म्हणून भेट घेऊन निवेदन देण्यात आले त्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई सेंट्रल महाव्यवस्थापक वाहतूक यांनी विभागीय नियंत्रक लातुर यांना बटणपुर-देवणी-होनाळी -येनकी- उदगीर बस चालु करण्या बाबत सुचना केली.या सूचनेनुसार विभागीय निंबधक लातुर यांनी सदर बस चालु करण्याची सुचना आगार प्रमुख उदगीर यांना केली. आगार प्रमुख उदगीर यांनी बटणपुर-देवणी-होनाळी-येनकी- उदगीर बस चालु होवुन होनाळी गावात बस आल्यावर बसचे चालक व वाहक यांचे पुष्पहार घालून श्री.बालाजीराव बिरादार यांनी स्वागत केले या विनोद मुळे,पिराजी कोळी,आत्माराम आलुरे, कामाजी बालुरे, विठ्ठल बेळकोणे,लक्ष्मण गिरी, दिपक आलुरे उपस्थित होते. सदरील बस चालु झाल्यामुळे होनाळी,भोपणी,माणकी,येनकी,जकनाळ,उदगीर या गावातील नागरीक प्रवाशी,विद्यार्थी, विदयार्थीनी ना शाळेतून येण्यासाठी सोय होनार आहे. सदरील बटणपुर-देवणी-होनाळी-येनकी-उदगीर दुपारी चार वाजताची चालु केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन मंञी व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष मा.ना.श्री. प्रतापसिंह सरनाईक, महाव्यवस्थापक मुंबई सेंट्रल, विभागीय नियंत्रक लातुर श्री.अश्विजराव जानराव, आगार प्रमुख उदगीर श्री.चिन्मय चिटणीस, वाहतुक निरीक्षक श्री.अशोकराव पवार, वाहतुक कंट्रोलर देवणी श्री
शिवाजीराव पाटील,श्री.भानुदास म्हेञे यांचे अआभार राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यानी मानले आहेत.