
लातूर : देवणी तालुक्यातील गरीब शेतकरी घराण्यातील जन्म घेतलेल्या पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांची केसरिया हिंदू वाहिनी मुख्य मोर्चाचा सर्वच सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पृथ्वीराज पाटील आनंद जीवने,यांनी सांगितले की, केसरीय हिंदू वाहिनी ही एक गैर-राजकीय संघटना आहे, ज्याचे 30 राज्ये आणि 13 देशांमध्ये पदाधिकारी आहेत, जे संत, महात्मा आणि पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, गोसेवा, रक्तदान, रोटी बँक, महिला सक्षमीकरण, हिंदू मंडळाची स्थापना, गुरुकुलांचे बांधकाम, गोशाळा बांधणे, सनातनला बळकटी देणे गोरगरीब शेतकरी शेतमजूर अंध अपंग बाल विधवाअशी कामे सतत करत असतात. केसरीया हिंदू

वाहिनी ही एक ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत आहे आणि नीती आयोग, एमएसएमई मंत्रालय, बुद्धिमत्ता, मानवाधिकार, पर्यावरण, आरोग्य मंत्रालय तसेच आयकर विभाग यासह अनेक मंत्रालयांनी प्रमाणित केली आहे. केसरीया हिंदू वाहिनीला पूर्ण आयकर सूट आहे, यासोबतच केसरीया हिंदू वाहिनी कुटुंबाला लंडनच्या इंडिया ग्लोरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. केशरिया हिंदू वाहिनीचे संस्थापक, अतुल मिश्रा यांना यांच्या मार्गदर्शना अतुल मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीकरिता त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातून सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.