बार्टी व विविध सामाजिक संस्था यांच्या वतीने लातूर येथे महात्मा गांधी यांची जयंती साजरी.
बलभीम सूरवसे/ लातूर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे (बार्टी) आणि लातूर येथील सुमनदेवी सामाजिक विकास संस्था व लोक परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी लातूर येथील गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी ग्रामविकास व ग्रामीण सामाजिक विकास घडवण्यासाठी खेड्याकडे चला हा संदेश दिला होता.आज खऱ्या अर्थाने समाज कल्याण विभाग व बार्टी यांच्या वतीने राज्यात 50 हजार (SSYG) स्वयंसहायता गट तयार करून त्याच्या माध्यमातून युवक-युवतींचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व त्याच बरोबर गावातील सामाजिक सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी समतादूत यांच्यामार्फत कार्य केले जात आहे अशी माहिती जिल्हा प्रकल्प अधिकारी राजकुमार धनाशिरे यांनी या वेळी दिली.गांधीजींच्या स्वप्नातील विकासशील भारत घडविण्यासाठी सामाजिक संस्थेच्या वतीने वेळोवेळी काम केले जाईल असे मत सुमनदेवी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष आशिष भोपणीकर यांनी व्यक्त केले.तसेच ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आर्थिक साक्षरता मोहीम यासारखे उपक्रम राबवून लोकांमध्ये परिवर्तन घडविण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाईल असा निर्धार लोक परिवर्तन फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष संतोष बानाटे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.यावेळी समतादूत बलभीम सुरवसे यांनी उपस्थितांना समाज कल्याण विभाग व बार्टीच्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमास अरविंद कांबळे,राहुल बनसोडे, अंकुश आदमाने, सच्चिदानंद तिकटे,बालाजी बानाटे,अमोल सूर्यवंशी, बाबासाहेब जवादे, उमा आदमाने,विश्वरूपी तिकटे,वैशाली कांबळे, आणि लोक परिवर्तन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुरज सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.