मुंबई दि.५ (प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार शनिवारी ( दि.५) भालकी जि.बीदर येथे जनार्धन बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पञकाराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेचे चिटणीस सचिन शिवशेट्टे यांनी बीदर जिल्हा मराठी पञकार परिषदेची कार्यकारणी जाहीर केली. यात अध्यक्षपदी दयानंद बिरादार , कार्याध्यक्ष तुकाराम मोरे , उपाध्यक्ष दत्तात्रय स्वामी , सचिव दत्ताञय साबने , सहसचिव प्रा. सौ. मिनाक्षीताई पाटील ,
कोषाध्यक्ष मन्मथ स्वामी कार्यकरिणी सदस्य म्हणून अंकुश वाडीकर , विद्यासागर पाटील, महेश हुलसूरकर , तुकाराम शेडोळे , विनायक शिंदे सल्लागार सदस्य म्हणून माधव पिचारे , पी.आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीची निवड झाल्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..
येत्या कार्यकाळात जास्तीत जास्त पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली येतील आणि पत्रकारांचे प्रश्न आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा श्री.एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp