मराठवाडास्तरीय वादविवाद स्पर्धेत प्रेम डांगे याचे यश
उदगीर/ प्रतिनिधी : येथील नामांकित लालबहादूर शास्त्री विद्यालयात आयोजीत मराठवाडास्तरीय वादविवाद स्पर्धेत येथील सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयाचा सातवीत शिकत असलेल्या प्रेम दिगंबरराव डांगे या विद्यार्थ्याने चौथा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.त्याच्या हया यशाबद्दल सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंजूषा कुलकर्णी , बेंजरगे मॅडम, सौ.राचमा मळभागे, रोहित पाटील, संकुलवाड, रामेश्वर पटवारी, शानेवार मॅडम, नरसिंग काकरे, दिगंबर डांगे, अनिल सूर्यवंशी, हणमंत सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, विश्वंभर डांगे, अंकुश डांगे, पांडुरंग डांगे,प्रा.संजय जामकर यांनी अभिनंदन केले आहे.