मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर ते म्हणजे अज्ञानी मराठा हा अज्ञानी मराठा नोकरदार,राजकीय क्षेत्र,तरुण मुल मुली,स्त्रिया ,शेतकरी, बेरोजगार अशा सर्व क्षेत्रात विभागला असून त्यापैकी तरुण मुलं हे हिंदुत्ववाद्यांसाठी अतिशय सोपी शिकार असून त्यांच्या मनावर कट्टर हिंदुत्वाचा प्रभाव टाकून… सत्य परिस्थिती पासून खूप दूर घेऊन जाण्याची प्रक्रिया it सेल ने सुरु केली आहे…
म्हणून आपली पोर कट्टर हिंदू मराठा या नावाखाली विविध ग्रुप वर आपल्या च समाज बांधवांना विरोध करत आहेत
शिक्षण,शेती, व्यवसाय, आरोग्य, योग्य वेळी विवाह,कौटुंबिक वाद तसेच सामाजिक कलह हा वडीलधाऱ्या मंडळीच्या सल्ल्यानुसार सोडवणे या आपल्या मूळ प्रश्नापासून हे लोक आपल्याला कोसो दूर घेवून जात आहेत…
अल्लाउद्दीन खिलजीने 11 व्या शतकात सतरा वेळेस सोमेश्वर मंदिर लुटलं होतं… देवगिरीचे राज्य १४ व्या शतकात बुडवल होत… सो 16व्या शतकात मुघलांनी हिंदुस्थानातील सगळी मंदिरे पाडली होती.. आणि म्हणून 21 व्या शतकात सर्व हिंदूंनी एकत्र झाले पाहिजेत.. अशा कथा एकवून आपल्या कोवळ्या पोरांच्या मनावर सतत आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण करत असतात…
पण त्यावर उपाय म्हणून फक्त बीजेपीला सत्ता द्या एवढाच पर्याय ही मंडळी सांगतात
कधी एखाद्या मराठ्याच्या पोराच्या शिक्षणाचा खर्च, कधी एखादा गंभीर आजारात एखाद्या समाज बांधवांना मदत करणे, गोरगरीब मुला-मुलींचे विवाह लावणे, एकमेकांसोबत संपर्क ठेवून व्यापार व व्यवसाय करणे असा कोणताच योग्य उपाय हे लोक करत नाहीत.. फक्त हिंदू खत्रे मे है या नावाखाली सत्ता मात्र उपभोगत असतात आणि त्या सत्तेतून काही ठराविक मोजक्याच जातीतील मंडळींना… यूपीएससी एमपीएससी परीक्षा न देता सरळ सचिव व IAS दर्जाचे अधिकारी नेमणूक करणे… कंपन्यांचे शेअर्स च्या किमती वाढवून लाभ देणे, मोक्याच्या ठिकाणी प्लॉट व जमिनी खरेदी करण्यासाठी गुप्तपणे मदत करणे, ठराविक जातीतील लोकांना उद्योगधंद्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे, मोठे मोठे कारखाने बांधण्यासाठी कर्ज देणे आणि त्यांच्याकडून पैसा घेऊन परत सत्ता हस्तगत करणे हेच उद्योग तथाकथित हिंदुत्ववादी मंडळी करत असतात…
म्हणून मराठ्यांनो आपल्या पोरांना सांभाळा.. या तथाकथित हिंदुत्ववादी लोकांच्या दुष्टचक्रात अडकवण्यापासून वाचवा
शिक्षण, आरोग्य, उद्योग,शेती, नोकरी, व्यवसाय योग्य पद्धतीने करण्याचे शिक्षण द्या व एकमेकांसोबत प्रेमाने वागण्याचा सल्ला द्या… एक मराठा लाख मराठा…
इंजि. विनायक बगदुरे… निलंगा लातूर….8237600000