दिनांक 2 ते 3 ऑक्टोबर आणि दिनांक 5 ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. सदर कालावधी मध्ये विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये कारण या कालावधी मध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. जनावरे झाडाखाली /पाण्याच्या स्त्रोताचा जवळ / विद्युत खांबाजवळ बांधू नये. त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ /नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. पुलावरून किंवा नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरप्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.


सुरेश घोळवे
तहसीलदार, देवणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp