उदगीर / प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या हैबतपूर येथे गावातील उच्चशिक्षित तरुण एकत्र येऊन गावात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठान स्थापन केले त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हरित हैबतपुर संकल्पना सुरुवात व प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्यासाठी उद्घाटक म्हणून जि.प.अध्यक्ष राहूल केंद्रे बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो कोणी प्रशान केले.तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.असेच हे मरून उच्चशिक्षित होवून गावांसाठी काम करत आहेत यांचे समाधान वाटते. मौजे हैबतपुर गावातील उच्चशिक्षित असलेली तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत .
ज्या मातीत जन्मलो त्या मातीत काहीतरी देणे लागतो. असा सकारात्मक विचार उराशी बाळगून मातृभूमी प्रतिष्ठान स्थापन केले याचा मला मनस्वी आनंद वाटतो असे व्यक्त करून प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरचे पश्चिम उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दत्ता गिरी साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून पं सं सदस्य सुभाष कांबळे सरपंच सुधाकर दंडीमे, तिवटग्याळचे सरपंच गजानन नरहरे, ग्रामसेवक पांचाळ एन .पी .उपसरपंच धनाजी बिरादार, तलाठी राहुल आचमे, माजी सैनिक संदीप, रोडगे, गिरी सर, गंगाधर बिरादार, राम पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी सैनिक कोंडीबा दंडीमे, सचिव महेश पाटील ग्रामपंचायत सदस्य बालाजी बिरादार, दिलीप तेंलगपूरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉ. सतीश डॉ.परमेश्वर बिरादार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना मा.दत्ता गिरी साहेब यांनी जि.प.च्या विविध योजनांची माहिती सांगून प्रतिष्ठानचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंतेश्वर बिरादार तर आभार प्रा. शरद शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोंडीराम बिरादार भरत दंडीमे, सुरत सय्यद, धनाजी बिरादार, कोंडीबा दंडीमे, डॉ. परमेश्वर डॉ. सतीश बिरादर प्रा. महेश पाटील प्रा.शरद शिंदे अशोक तेंलगपूरे, आदीने परिश्रम घेतले गावातील जेष्ठ नागरिक राजेंद्र पाटील सर यांनी 2100 रु.सतीश दंडमे 500रु. अरविंद दंडीमे यांनी1100रु. देणगी स्वरूपात प्रतिष्ठानला दान दिले. प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्र महोत्सवात राबवलेल्या विविध स्पर्धाचे पारितोषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील तरुण ,महिला, ज्येष्ठ नागरिक ,शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.