मानवी भाव आणि अर्थ याचे संकलन म्हणजे भावार्थ रामायण होय . –पंडित कुमठे.
पृथ्वीतलावर जेंव्हा जेंव्हा अन्याय अत्याचार वाढतो तेंव्हा तेंव्हा दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताला आवतार घ्यावा लागतो. या आवतार काळात मानव प्राण्याला सुखी समाधानी जीवनाचा मार्ग दाखवून दिला जातो. अश्याच एका राम अवताराची कहाणी ज्या मध्ये एक आदर्श पिता, एक आदर्श पुत्र, एक आदर्श भाऊ, एक आदर्श पती व एक आदर्श राजा कसा असायला पाहिजे त्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण मानवी भाव आणि अर्थ याचे संकलन म्हणजे भावार्थ रामायण होय असे मत पंडित विश्वनाथ कुमठे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी नियमितपणे घेतल्या जात असलेल्या वाचक संवाद या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापिका प्रतिभा बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या श्रीराम जयंती विशेष 286 व्या वाचक संवादात पंडित विश्वनाथ कुमठे यांनी डॉ. ज्ञानेश्वर तांदळे संपादित भावार्थ रामायण या साहित्यकृतीवर बोलताना रामायणातील अनेक प्रसंग सांगत त्यातील भावार्थ वेग वेगळ्या उदाहरणांसह लक्षात आणून दिले.
यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना जन्मदिनानिमित्त ग्रंथ भेट देण्यात आली. शेवटी मुख्याध्यापिका प्रतिभा बिरादार यांनी आपल्या शाळेत येवढा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून रामायणातील अनेक प्रसंगाचे सुंदर विवेचन केल्याबद्दल संवादक व आयोजक दोघांचेही आभार मानले. वाचक संवादाच्या सातत्यपूर्णते बद्दल कौतुक केले.
महेश प्राथमिक विद्यालय,उदगीर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास कु. सोनू फावडे , डॉ. एम.बी. शेटकार, उमाताई ढगे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सुमित्रा वट्टमवार, ब्रिगेडियर बाबूराव सोमवंशी, दि ली. होळीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक पदाधिकारी आणि वाचक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप ढगे यांनी केले तर आभार गुंडप्पा पाटणे यांनी मानले. यशस्वीतते साठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व आनंद बिरादार, राजपाल पाटील, मिटू पाटील, सुरेश वजनम, बालाजी सुवर्णकार आदींसह अनेकांनी प्रयत्न केले.