देवणी / प्रतिनिधी : आज दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी देवणी येथील प्रतिष्ठित उद्योजक,सर्वसामान्य लोकांबद्दल प्रेम असणारे, शांत,संयमी व प्रसन्न व्यक्तिमत्त्व मा.श्री. मल्लिकार्जुन मानकरी साहेब (सावकार) यांची त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेवून प्रा.डॉ. शिवाजी सोनटक्के व प्रा.डॉ. नामदेव खंडगावे संपादित “घडलो आम्ही पुस्तकांमुळेच..
हा ग्रंथ भेट देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद लातूर चे माजी बांधकाम सभापती मा.श्री. नागेशजी जीवने साहेब उपस्थित होते. या प्रसंगी मा.श्री. मल्लिकार्जुन मानकरी साहेब यांनी संपादकांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.प्रा.डॉ. शिवाजी सोनटक्के, उपप्राचार्य तथा ग्रंथपाल,रसिका महाविद्यालय देवणी जिल्हा लातूर (9405821890)