मूर्खांची पांच लक्षणं सातव्या शतकात धर्मकीर्ती नावाचे महान तत्वज्ञानी होऊन गेले. त्यांनी "प्रमाणवार्तिकम्" नावाचा ग्रंथ लिहिला आहे.त्या ग्रंथात त्यांनी मूर्खांची पाच लक्षणं सांगितलेली आहेत.ती खालीलप्रमाणे
१) वेदप्रामाण्य मानणे. अर्थात ग्रंथप्रामाण्य मानणे.ग्रंथातील सर्व सत्य असते,असे समजणे.
२) विश्वाचा कर्ता ईश्वर आहे असे मानणे.
३) तीर्थक्षेत्री स्नान केल्यावर पुण्यप्राप्ती होते,असे समजणे.
४) जातीभेद बाळगणे.मानव हीच एक जात असताना.इतरांना कमी लेखणे.
५) शरीराला क्लेश देणे.उपास-तापास,व्रतवैकल्ये केल्याने पापक्षालन होऊन पुण्यप्राप्ती होते,असे समजणे.
( वेदप्रामाण्य कास्यचित्त कर्तृवाद:
स्नाने धर्मेच्छा जातिवादावलेप: ।
संतापनं पापहानाय चेति
ध्वस्तप्रज्ञानां पंचलिंगानि जाडये ।। ) धर्मकीर्ती यांनी सांगितलेली ही आहेत मूर्खाची पाच लक्षणे.ही लक्षणें आपणास लागू होत नसतील तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत.
-डॉ.श्रीमंत कोकाटे