युक्रेन प्रश्नामुळे सारे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे शक्यतो महायुद्ध तर होणार नाहीच पण पण शंभर टक्के शक्यताही नाकारता येत नाही याचे जगावर तसेच आपल्या देशावर सुद्धा खूप वाईट परिणाम होऊ शकतात युक्रेन हा रशियाच्या नंतर युरोप खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे नैसर्गिक खनिज संपत्तीने ठासून भरलेला शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आर्थिक सक्षम तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी असलेला कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेला युरोपातील गव्हाचे कोठार म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र म्हणून याची ओळख असलेला या ठिकाणची जनताही 99.99% कॅकेशायर भौगोलिक वंशगटाची आहे हा देश 1991 च्या अगोदर सोव्हिएट रशियाचा भाग म्हणून ओळखला जात होता याच वेळेस रशिया मधून एकूण पंधरा घटक राज्य बाहेर पडले त्यावेळेस हा सुद्धा बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण झाला आज पर्यंत चे अनेक युद्ध जमिनीवर समुद्रावर आणि आकाशात लढले गेले पण आज परिस्थितीने व्यापक रूप घेतल्यास आजपर्यंतच्या युद्धापेक्षा हे युद्ध वेगळ्याच पद्धतीने लढले जाऊ शकते जमिनीवर समुद्रावर आकाशातून आणि अंतराळातून सुद्धा लढले जाऊ शकते या युद्धामध्ये सायबर अटॅक केले जाऊ शकतात एकमेकाच्या संगणकामध्ये व्हायरसच्या मार्गाने घुसखोरी करून एकमेकाची माहिती घेणे आणि शत्रू राष्ट्राने संग्रहित केलेली माहिती नष्ट करणे संगणक यंत्रणा निष्क्रिय करणे तसेच अंतराळातील सॅटॅलाइट एकमेकाचे नष्ट करणे एकमेकाचे अंतराळ स्थानक नष्ट करणे अशा पद्धतीने एकमेकाच्या संपर्क यंत्रनेवर हल्ले करून हे संपर्क यंत्रणा नष्ट करू शकतात अशा पद्धतीने हे युद्ध लढले जाऊ शकते आणि याचा संपूर्ण जगावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो जीवित हानी सोबतच पर्यावरण अर्थकारण अशा अनेक गोष्टी वरती याचा परिणाम होऊ शकतो युद्ध झाल्यास युद्धानंतर साऱ्या जगाला असा थकवा जाणवतो की या थकव्यामुळे साऱ्या जगाची क्रयशक्ती कमजोर होत असते असे झाल्यामुळे मंदीची लाट जगभर पसरू शकते चलनाचे अवमूल्यन व्यापारातली मंदि आणि चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे होणारी भाववाढ ही गरीबीला निमंत्रण देऊन जगाचे आर्थिक कंबरड मोडू शकते सारे जग विकासाच्या मार्गावरून अनेक वर्षांनी मागे खेचू शकते या युद्धाचे आपल्या देशावर ती काय परिणाम होऊ शकतात आज ते थोडक्यात पाहू या आज रोजी युक्रेनमध्ये 18 हजार विद्यार्थी भावी आयुष्य घडवण्यासाठी गेलेले आहेत यांचे शैक्षणिक भविष्य अशा घटनेमुळे अधांतरी होऊ शकते या युद्धजन्य प्रसंगामुळे आपल्या देशाची सत्त्वपरीक्षा चालू झालेली आहे अनेक दिवसांपासूनचा रशिया हा आपला मित्र असलेला याची साथ सोडता येत नाही आणि अमेरिकेच्या विरोधात जाताही येत नाही यामुळे भारत परिस्थिती कशीही झाली तरी शेवटपर्यंत तटस्थ राहणार हे मात्र नक्कीच भारताचा व्यापार हा नाटो राष्ट्रसंघटनेसोबत खूप मोठा होत असतो आणि रशिया सोबत असलेले लष्करी संबंध एकूण लष्करी साहित्याच्या आयातीपैकी 60 टक्के आयात ही रशियावर अवलंबून आहे यामुळे रशियाच्या विरोधात जाता येत नाही जर अमेरिकेने रशियावरती कठोर आर्थिक निर्बंध लादल्यास रशियासोबतचा अपूर्ण असलेला एस फोर हंड्रेड मिसाईल हा व्यवहार रखडू शकतो या एस फोर हंड्रेड मिसाईल सिस्टमची चीनच्या संभाव्य लष्करी हल्ल्याला तोंड देण्यासाठी याची आपल्याला खूप गरज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा शत्रू राष्ट्र चीन याचे मात्र बळ वाढू शकते कारण रशियाचे शत्रू तेच चीनचे शत्रु आहेत हे दोघेही एकमेकांना पाठिंबा देऊ शकतात आणि अधिक जवळ येऊ शकतात या दोघांचे एकत्रित येणे हे भारतासाठी पोषक ठरत नाही अशा अनेक गोष्टीतून या युद्धाचे या प्रसंगाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्यावर अशा प्रकारचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात घडू शकतात हे मात्र खरे
– लेखक आर बी बिरादार