लातूरात एप्रिलमध्ये ‘फुले -आंबेडकर व्याख्यानमाला ‘ कार्यान्वीत होणार .

लातूर / प्रतिनिधी(टाळीकोटे एम.बि.) : येथील प्रकाशनगरमधील ‘ प्रबोधन ‘ या नरसिंग घोडके यांच्या निवासस्थानी प्रा.डॉ. अशोक नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर शहरातील विविध परिवर्तनवादी संघटनांचे प्रमुख / प्रतिनिधी यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रपिता ज्योतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त लातूरमध्ये दि. 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत ‘ फुले – आंबेडकर व्याख्यानमाला ‘ या बॅनरखाली वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले. या तीन

दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये फुले – आंबेडकरांचे स्वप्न आणि आजचे वास्तव या विषयावर चर्चा घडवून आणण्याचे निश्चीत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष -नरसिंग घोडके, कार्याध्यक्ष – प्रा.डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे, उपाध्यक्ष – श्रीधर शेवाळे, सचिव – भरत सूर्यवंशी, कोषाध्यक्ष – यु.डी. गायकवाड, सहकोषाध्यक्ष – प्रा .डॉ. अशोक नारनवरे तर सल्लागार म्हणून सर्वश्री डी.एस. नरसिंगे, प्रा. युवराज वाघमारे, सुभाष मस्के, जितेंद्र सुर्यवंशी,अॅड. राजकुमार गंडले आदींची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लागणारा निधी सर्व समविचारी संघटना आणि समाजातील सर्वसामान्य आणि दानशूर व्यक्तींकडून जमा करण्याचे ठरले.
या बैठकीस ‘ लसाकम ‘ सत्यशोधक समाज महासंघ, सत्यशोधक समाज महासंघ, गुरू रविदास सत्यशोधक समाज, बीसेफ, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, मुप्टा ,कास्ट्राईब शिक्षक संघटना, बामसेफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट फोरम आणि भारतीय बौध्द महासंघ आदी संघटनांचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीस सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमीत अभिवादन करण्यात आले. नरसिंग घोडके यांनी बैठकीचे आयोजन आणि सूत्रसंचलन केले. तर मधुकर दुवे यांनी आभार मानले.
यावेळी अॅड. दिपक साठे, राजकुमार नामवाड, शिरीष दिवेकर, नारायण कांबळे, नवनाथ वाघमारे, राजेश तोगरे, जी.टी. होसूरकर, बाबुराव बनसोडे, मांदळे सर, राजेंद्र हजारे, शिरीष दिवेकर आदींसह अन्य कर्मचारी / कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp