शेंद्रिय शेती “काल-आज-उद्या” या विषयावर होणार मंथन..

काळी आई वाचवा आभियानाची सुरुवात..
लातूर / विशेष प्रतिनिधी(एम.बि.टाळीकोटे) : कृषी प्रधान राष्ट्र आसलेल्या भारताची सध्याची परिस्थिती शेती करीत आसताना मातीचे आरोग्य न जपता आव्याहतपणे बिन दिक्कत रासायनिक खतांचा वापर व पेस्टीसाईड व हर्बिसाईडचा होणारा आतिरेकी वापर यामुळे जमीन, जल,हवामान यावर निर्माण केलेले प्रदूषण यामुळे होणारे वारंवार हवामानातील बदल या सर्व बाबींचा शेती आणि मानवी जीवनावर होत चाललेला परिणाम दिवसेंदिवस हानिकारक ठरत चालला आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणून “विशमुक्त शेती आणि विशमुक्त आन्न” निर्मिती कडे कल वाढणे आपेक्षीत आहे. परंतु त्या मानाने लोकांचा कल आजूनही म्हणावा तेवढा वाढलेला दिसत नाही. म्हणून काळी आई वाचवा आभियानाच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकऱ्यांना व सुशिक्षित आसलेल्या लोकांना जागृत करण्यासाठी दिनांक14-05-2023 रविवारी सकाळी 11.00 वाजता लातूर मार्केट यार्ड येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षी च्या खरिप हंगामातील नियोजनासाठी लागणारे शेंद्रिय नैनोटेक्नौलौजी युक्त युरिया, शेंद्रिय एन.पि.के.युक्त खतांची लौचिंग करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंडियाग्रो कंपनीचे प्रमुख शास्त्रज्ञ मोहन बेलगमवार आसणार आहेत. या कार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी माय लाईफस्टाईल कंपनीचे आय.टि.सी.लिडर तात्यासाहेब इंगळे आसणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून एन.टि.सी.लिडर निजाम शेख राहणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन माय लाईफस्टाईल कंपनीचे शाम जाधव, शफीक पटेल , इरशाद शेख, नागनाथ गड्डीमे, बालाजी तोंडारे, शिवाजी आंबेगावे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, डॉ मधूकर कांबळे, जाकिर बागवान, सचिन मंगनाळे, शादुल बौडिवाले,ओमकार मस्कले, गोपाल सांडवे, विकास जाधव, ईश्वर सुर्यवंशी,वनमाला भंडे, संध्या पाटील,दिलीप शिंदे, राम येरमे,कमलकिशोर मेहतरे, राहुल बालुरे, अनिल जाधव, दीपक गुंजरगे, सदाशिव सावरगावे,गजानन कोंपलें, आतिर शेख आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
