लातूर जिल्ह्यातील वलांडी भागात भूकंपाचे 3 धक्के ??
प्रशासनाने केला खुलासा ही अफवा…!!
लातुर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यात आसलेल्या
वलांडी या गावाच्या परिसरात आज दुपारी भूकंपाचे 3 धक्के बसल्याची घटना घडली आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
1993 साली म्हणजे 28 वर्षांपूर्वी औसा तालुक्यातील किल्लारी गावात मोठा प्रलयंकारी भूकंप झाला अन अनेक गाव जमीनदोस्त झाली यांच्या आठवणी जाग्या झाल्या. या बाबत प्रशासनाकडे चौकशी होऊ लागली त्यानुसार National Center for Seismology Ministry of Earth Sciences, Government of India यांच्याकडून लातूर जिल्हा प्रशासनाने खात्री करून घेतली आहे लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी लातूर जिल्ह्यात कुठेही भूकंप झाला नसून ही अफवा असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे