
उदगीर / बातमीदार :
उदगीर येथील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने वक्फ संशोधन कायदा केंद्र सरकारने पारित केले आहे ते तातडीने रद्द करावे म्हणून धारणा आंदोलन करण्यात आले व कायदा हे संविधान विरोधी स्वतंत्र याच्यावर गंडा घालणारा असणारा कायदा तात्काळ रद्द करावा म्हणून आंदोलन करत्यांनी घोषणाबाजी केली.
या सरकारला जमिनी हडपून अदानी अंबानीच्या घश्यात घालायचे आहे. म्हणून याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा सरकार प्रायोजित कार्यक्रम राबविला जात आहे असे ज्येष्ठ सामाजिक नेते रंगा राचुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
देशामध्ये शांतता आणि अखंडता अबाधित ठेवायची असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांचे हक्क त्याला मिळायलाच पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक समूह आणि घटकांच्या बाबतीत विचारपूर्वक त्यांना संरक्षण दिलेला होता त्या संरक्षण सध्याचा सरकार देत नसल्याची मला खंत वाटत आहे.
आपल्या शरीरातील एका बोटाला जर इजा झाली तर पूर्ण शरीरामध्ये त्याचा त्रास होतो त्याच पद्धतीने देशातील एका समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर आपला देश हे प्रगती करणार नाही वकदीर संशोधन हे फक्त आणि फक्त बोर्ड मार्फत किंवा मुस्लिम साठी मर्यादित नसून हे घटनेवर झालेला खूप मोठा हल्ला मी समजतो म्हणून ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जायचे आणि गल्लीबोळातील सर्व समाजाला एकत्रित करून हे लढली जाण्याची तयारी माझी आहे आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बसवराज पाटील नागरकर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले.
या धरणे आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदविला प्रामुख्याने बसवराज पाटील नागराळकर, कल्याण पाटील ,रंगाराचुरे, मंजूर खान पठाण ,माजी नगरसेवक, महबूब शेख, शेख समृदिन अहमद सर्वर अब्दुल समद बागवान, अझरोद्दीन शेख, साबीर पटेल ,शेख तयार, नसरुद्दीन शेख सलीम , शेख समीर ,अहसान सिद्दीफी, सय्यद जानीमिया, अशोक भाऊ दायमी रहीम हाश्मी मिसबा डॉ. अजगर, शेख इब्राहिम, डॉ.शब्बीर मौलाना अजीजू रहमान,मौलाना जाकीर मोलाना मोहयोद्दीन शेख हमीद भाई नजरुल जळकोटे मुदस्सिर शेख अन्य सामाजिक

