पालक शिक्षक शाळेचाकणा,विद्यार्थी शाळेचा पायाअसतो सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्धाच्या जीवनातील विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजला पाहिजे—- बन व्हि.व्ही.
देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील श्री योगेश्वरीदेवी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा समांतर अंतर पाळून साजरा करण्यात आले ५ /१२/२१ रविवारी सकाळी अकरा वाजता शाळेत पालक मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री यशवंतरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले, प्रमुख पाहुणे मा, बन व्हि,व्हि, संस्थेचे सचिव, वरुनराज सूर्यवंशी वात्सल्य समिती देवणी तालुका सदस्य, पत्रकार रणदिवे लक्ष्मण,यांच्या प्रमुख उपस्थितीत होती यावेळी विद्यार्थ्यांचे पालक श्री पांचाळ सुरेश व श्री रणदिवे लक्ष्मण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बन सर बोलताना शिक्षक पालक हे शाळेचा पाया असतो विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे व महामानवांचे आदर्श घेऊन स्वताच्या पायावर विद्यार्थी घडला पाहिजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही व संविधान आहे म्हणून आपण आहोत या शाळेचा विद्यार्थी मोठ्या पदावर गेले पाहिजे असे मत व्यक्त केले.वरुनराज सुर्यवंशी यांनी कोविड १९चा नियम व कायदा काय असतो विविध योजनांची माहिती दिली, प्रास्ताविक शेख एस,व्हि, शंकर गरड, सुर्यवंशी सर, कस्तुरे सर विक्रम बिरादार,
सौ. देवणीकर एस,एल, बिरादार सर, सूत्रसंचालन श्री मलवाडे आर.पी. पालकांशी संवाद श्री घोणसे ए.बी.आभार प्रदर्शन श्री शेवाळे एस.डी. पालक दिलीप सुर्यवंशी, राजकुमार कुमदाळे, संगिता इरकर,रेखा सुर्यवंशी व पालक शिक्षक उपस्थित होते.