– पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे

वेळ अमावस्या निमित्त बाहेरगावी जाताय ❗ तर सावध राहा…

पोलिस स्टेशन देवणी कडून चोऱ्या व अपघात होऊ नये यासाठी सर्व जनतेस सूचना::……

देवणी / प्रतिनिधी : उद्या दि.23/12/22 रोजी वेळ अमावस्या असून, मुख्यतः लातूर व इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व आनंदात , आपापले / मित्रांचे / नातेवाईकांचे शेतात जाऊन साजरा केली जाते. वेळ अमावस्या निमित्त सर्वजण एक दिवस पूर्व बाहेर गावी जातात. अशा वेळी बंद घरी दिवसा अथवा रात्री चोऱ्या होण्याच्या घटना पूर्वी घडलेल्या आहेत. तसेच प्रवास करताना घाई गडबडीने / मद्य, दारु सेवन करून वाहन चालवलेमुळे अपघात होतात.
आपले आनंदात काही अघटीत, वाईट घडू नये, यासाठी काही सूचना लक्षात ठेवणे गरजेचे आहे तसेच आपले बंद घरी चोऱ्या होऊ नये यासाठी, जनतेने सतर्क राहावे…

:रोड अपघात होऊ नये यासाठी..:
1) वेळ अमावस्या निमित्त बाहेरगावी जाताना मोटार सायकल अथवा वाहनाने जाताना रस्ते सुरक्षा बाबत नियमांचे पालन करावे. जेणे करून रस्ते अपघात होणार नाहीत.
2) प्रवास करताना / वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे.
3) हेल्मेटचा वापर करावा…

::बंद घरी चोरी होऊ नये यासाठी….:
1) बाहेरगावी / शेतात गेल्यास , सर्वच सदस्य बाहेरगावी न जाता, दिवसा व रात्री आपले घरी एखादा सदस्य हजर ठेवावा व सतर्क राहावे..
2)मौल्यवान दागीने, पैसै हे चोरी झाल्यास चोरट्यांचे हाती कपाटात ठेवल्यास सहज हाती लागते, त्यामुळे ते दुसर्‍या एखादया ठिकाणी ठेवावे.

  • जेणेकरुन घरात चोर आले तरी ते दागीने चोरांचे हाती लागणार नाही,

3) वेळ अमावस्या साठी घराबाहेर / बाहेर गावी जाताना घर व्यवस्थित लॉक करावे,शेजार्‍यांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे,
4) महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणे,( Chain snaching) सारख्या घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी.
5) आपल्य‍ा घराभोवती कुणी संशईत इसम दिसल्यास पोलीस‍ांना कळवावे.
6) रात्रीचे/ दिवसाचे वेळी संशयित व्यक्ती / वाहन दिसल्यास पोलिसांना संपर्क करावा.
7) नेहमी/ दररोज मौल्यवान वस्तू, पैसै व सोने बैठकीचे/ लक्ष असणारे खोलीत ठेवावे व त्या रात्री त्याच खोलीत झोपावे व सुरक्षा बाळगावी.

  • देवणी पोलीसाकडून चोऱ्या व अपघात होऊ नये यासाठी वेळोवेळी पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्यात येत असते.
  • देवणी पोलिस 24 तास जणतेसाठी सतर्क व मदतीसाठी तयार आहे.
  • तरी चोरी अथवा इतर अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पो स्टे देवणी येथे खालील नंबरवर संपर्क साधा

जी एम सोंडारे
पो.निरीक्षक
देवणी पोलीस ठाणे
9823815125,

  • मुजाहिद शेख
    पोलीस उपनिरीक्षक्र
    9146248493

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp