निडेबन येथे ३८ उपासक-उपासिकांनी घेतली धम्मंदिक्षा
उदगीर / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) :
उदगीर येथे धम्म दीक्षा कार्यक्रम रविवारी शाक्यरत्न बुद्ध विहार निडेबन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमिचे पुजन करून ३८ उपासक उपासिका यांना सदधम्मं उपासक मधूकर राजवर्धन यांच्या पुढाकारात धम्म दीक्षा देण्यात आले.
या वेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाऊराव सोमवंशी होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पी.एस, गौतम, अॕड एम डी, चौरे, इंजि डी. बि.गौतम, बी.एम सोनकांबळे, डॉ सत्यप्रकाश, विजय गौतम, हरगोविंद गौतम, नानकचंद गौतम, राजवर्धन मधुकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म दीक्षा देण्यात आली. उपासक उपासिका, कांबळे अमृपाली, कांबळे संपती, कांबळे चंद्रकला, चौधरी रोहिणी, ढगे रोहिणी, सुर्यवंशी दिपरत्न, सुर्यवंशी सिध्दांत, कांबळे नम्रता, सुर्यवंशी ज्योती यांसह अनेकांना धम्म दीक्षा देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती कांबळे, व आभार गुणवंत बनसोडे यांनी मांडले.या धम्म दिक्षा सोहळ्याला सारनाथ, मुंबई, यासह आनेक ठिकाणाहून धम्म उपासक,महिला, लहान बालके व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



