हिसामनगर येथील शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मागणी

देवणी / प्रतिनिधी : तालुक्यातील मौ.हिसामनगर येथील शेतकऱ्यांचा आनेक दिवसापासून प्रलंबित आसलेला प्रश्न म्हणजे हिसामनगर ते जवळगा शिवरस्ता (पानंद रस्ता ) शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्या-येण्यासाठी खुला करा अन्यथा शिवरस्ता बाधित शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परवानगी द्या आशी मागणी सोमवारी (ता.०६) लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.
सदर शिवरस्त्याचे काम सन.२०१२ मध्ये गैर अर्जदार विश्वनाथ दशरथ धनेगावे व शरद विश्वनाथ धनेगावे यांच्या शेतीपर्यंत नवद टक्के काम पूर्ण झाले आसून मग्रारोहयो मधून दबाई सुध्दा झाली आहे. परंतु गैर अर्जदाराचे उर्वरित रस्त्यावर अतिक्रमण आसल्यामुळे पुढील शिवरस्ता संपादीत आहे.आसे कारण लावून पुढचे माती काम होवू दिले नाही. त्यामुळे आनेक वर्षापासून सदर रस्त्याचे काम रखडले आहे. सध्या राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्या-येण्यासाठी व यंत्रसामग्री व उत्पादीत माल बाजारपेठे पर्यंत नेता यावे म्हणून पांदन रस्ता, शिव रस्ता कामे तातडीने करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यासाठी मंजुरी देण्यात येत आहे. परंतु मौ.हिसामनगर येथील शेतकऱ्यांना २०१८ पासून शिवस्ता (पांदन रस्ता) कामासाठी संबंधित आधिका-यांचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

अतिशय अडचणी आलेल्या शेतकऱ्यांनी शिवरस्ता व्हावा म्हणून तहसीलदार साहेब देवणी व भुमी अभिलेख उपाधिक्षक देवणी यांच्याकडे जावून मागणी केली आसता.(ता.२३-५-२०१८) रोजी जाय मोक्यावर जावून पंचनामा केला आसता त्यात मौ.हिसामनगर येथील स.न.४६,४८ व मौ.जवळगा येथील स.न.२०५,२०६,२०७ या स.न.ची मोजणी करणे अत्यंत आवश्यक आसून या दोन गावच्या शिव कायम करून सदर शिवरस्ता कायम खुला करून देण्यात येईल आसे उपाधिक्षक भूमी अभिलेख देवणी यांनी नायब तहसीलदार यांच्या समक्ष पंचनाम्यात सांगितले आहे.
या निवेदनावर धनाजी संभाजी धनेगावे, बाळासाहेब धनेगावे, बालाजी धनेगावे, मारोती धनेगावे, प्रताप धनेगावे, नामदेव धनेगावे, दिलीप तवडे सर्व रा.हिसामनगर यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp