लातूर : घरात अठरा विश्व दारिद्र्य असतानाही दारिद्र्यावर मात करीत अथक परिश्रमतून शून्यातून विश्व निर्माण करणारे बौद्ध समाजातील एक आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे नारायण सोनकांबळे हे होत
नारायण सोनकांबळे यांचे मूळ गाव जानापूर हे असले तरी यांचा जन्म पिंपरी ता उदगीर इथे मामाच्या गावी एका गरीब मजूर कुटुंबात झाला आईवडील यांच्या कौटुंबिक कलहामुळे नारायण सोनकांबळे हे आपल्या आईसोबत पिंपरी येथे राहिले त्यांचे बालपण आजोळी गेले त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी इथे झाले माध्यमिक शिक्षण उदगीर येथील नामांकित लाल बहादूर शास्त्री विद्यलयात झाले नारायण सोनकांबळे यांनी आपल्या बुद्धि कौशल्य जोरावर माध्यमिक विद्यालयात दहावी वर्गात डिस्टिक्सशन मिळवलं अनेक विषयात पारंगत असलेले नारायण सोनकांबळे यांचा नंबर डी एड व अभियांत्रिकी, यांनाही सहजा सहजी लागला ते सहज शिक्षक किंवा एक नामांकित इंजिनिअर झाले असते परंतु दोन वेळा जेवण करण्याचे वांदे तर उच्च शिक्षण शिक्षण घेयायचे कसे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर होता तरीही त्यांनी हार पत्करली नाही वडील असूनही त्यांना त्यांचे काहीच योगदान लाभले नाही वडिलांनी दुसरा विवाह करून आपला संसार थाटला त्यामुळेच नारायण सोनकांबळे यांच्याकडे वडिलांचे शंभर टक्के दुर्लक्ष झाले परंतु वडिलांनी जन्म देऊन दुनिया दाखवली यांचेही योगदान कमी नाही मुलाबाळांसंदर्भात वडिलांचे कर्तव्य असते ते पार न पाडल्यामुळे नारायण सोनकांबळे यांना विद्यार्थी दशेत त्रास सहन करावा लागला तो आजही विसरण्या सारखा नाही त्यामुळे नारायण सोनकांबळे यांना वडीला विषयी जी सहानुभूती राहिली नाही आईसोबत मोल मजुरी करून आपले शिक्षण पूर्ण करून सामाजिक वनीकरण विभागात उरण नाशिक येथे बरेच दिवस वनविभागात वृक्ष लागवड करणे नर्सरी तयार करणे शासनाच्या वृक्ष लागवड या शासकिय कार्यात सर्वधिक योगदान नारायण सोनकांबळे यांचे राहिले आहे विविध प्रकारच्या वृक्षाचा वनस्पतींचा चांगला अभ्यास करून वनविभागाच्या चांगल्या पदावर कार्यरत असताना अचानक काय झाले कळले नाही हे सर्व काही सोडून मुंबईत स्थायी वनविभागाच्या अधिकारी पदावर कार्य केले अचानक नोकरी गेल्याने नेमके काय करावे असा प्रश्न त्यांना पडला असावा मोलमजुरी करावी लागली असावी परन्तु अथक परिश्रम मेहनत यांच्या जोरावर आज तीन जेसीबी एक ब्रेकर असे मूल्यवान मशीन यंत्र घेऊन आपला उद्योग भरभराटीला आणला आहे एक मुलाचे शिक्षण शानदार लग्न दोन मुलाचे पदवीचे शिक्षण पूर्ण करून तीन जेसीबी ब्रेकर च्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करून समाजाला प्रेरणा देणारा आदर्श निर्माण केला आहे नारायण सोनकांबळे यांनी केलेल्या कार्याचे फलित आहे नारायण सोनकांबळे हे फुले, शाहू आंबेडकरी चळवळीचे पाईक आहेत सामाजिक शैक्षणिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी केलेली कार्य समजाला शंभर टक्के दिशादर्शक आहे त्यांच्या कार्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा
—- गिरीधर गायकवाड
नागराळकर 728961400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp