शेतकऱ्याला शेती करायची उसनी अक्कल देऊन सेंद्रिय शेतीचे महत्व सांगूच नका
*विषारी अन्न खायच्या लायकीचेच आहात सर्वजण…!”
“डॉक्टर,टोल,दारू,ट्रीप,पार्टी,हॉटेल, विकेंड,कपडेलत्ता,सलून,हेअर स्टाइल,फेशियल,चप्पल बूट, वडापाव, हे सर्व बार्गेनींग न करता घेता…!”
“फक्त शेती उत्पादित सर्व माल अन्नधान्य,भाजी,फळे तसेच दूध,दही, अंडे यांचे भाव वाढले की काढ मोर्चा अन् मतासाठी लाचार झालेलं सरकार जातधर्म /लव्ह जेहाद असा भेदभाव न करता पाकिस्तान सह इस्लामिक Country मधून धान्य आयात करता.”
“म्हणून शेतकरी आता…
तो तुमच्या बापाला ऐकणार नाही.
त्याच्या घरातील शेणाचा उकिरडा जगातील सर्वोत्तम असा नैसर्गिक खताचा कारखाना होता.
तुमच्या नादी लागला आणि त्याने युरिया मारायला सुरुवात केली.
उत्पन्न दुप्पट करायच्या नादात त्याचे कर्ज चौपट झाले.
तुमच्या घरात येणारी प्रत्येक भाजी विषारी आहे.
कीड आणि तुम्हीं ही बरोबरच मरायला लागला आहात!
पंजाब हरियानातून जी कॅन्सर ट्रेन येते त्याला शेतकरी जबाबदार नाही तर तुम्हीं फुकटे जबाबदार आहात.
कारण तुम्हांला जास्त आणि स्वस्त भाजी फुकटात हवी होती.
त्यामुळे तुम्हीं शेतकऱ्यांना हायब्रिड ची इंजेक्शन मारायला सुरुवात केली आणि त्या मुळेच त्याच्या मेंदूचा पचका झाला.
माझा शेतकरी बांधव त्याच्यापाशी असलेले सोने विसरला आणि तुमच्या पीतळाला भुलला…
देशी वाण संपूर्ण पणे संपले आहेत.
द्या त्याला अजून वाढीची औषधे.
गवता सारख्या भाज्या येतात फुकटे दोन रुपयाने खरेदी करतात आणि बाकी त्याला फेकून द्याव्या लागतात.
फुकट्यानंच्या बेंबटावले काहीच जात नाही.
म्हणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
अरे बाबांनो त्याच्या आहे त्या शेतमालाला,दुधाला योग्य बाजारभाव द्या!
तो आपसूकच उत्पन्न दुप्पट करील.
शेतकरी साऱ्या जगाचे ओझे उचलायला तयार आहे.
पण त्याला थोडी फार तरी साथ द्या!
नुसतेच तुम्हीं त्याचे रक्त पीत असताल तर कधीना कधी तो मरणारच आहे!
त्यालाच सगळे अक्कल शिकवतात.
ज्यांच्या बापाला उकिरडा म्हणजे नक्की काय भानगड असते हे माहीत नाही ते आम्हांला सेंद्रिय शेतीचे महत्व सांगतात.
जो खरा खानदानी शेतकरी आहे त्यालाच माहीत गावरान गाय नक्की किती दूध देते? आणि लाथा किती मारते?.
गावरान गायचे दूध तीच्या वासरालाच पुरत नाही तर त्याचे तूप कधी काढायचे?
रामदेव बाबाने हा प्रताप केला आहे.
घंट्याचे देशी तूप!
तुम्हीं आणि तुमची लेकरं आता आजारी पडायला लागला आहात म्हणून तुम्हांला शेंद्रिय शेतीचा पुळका आला आहे.
जा शेतकऱ्याच्या बांधावर जा.
जसे देवळात जाऊन देवाला,बडव्याना, पुजाऱ्याला दान देता तसे शेतकऱ्याला (त्याच्या घामाचे मोल) दान द्या.
तोच तुमची खरी अन्न देवता आहे.
शेती हे तुमचेही आणि त्याचे ही मंदिर आहे!!
तुमची शेतकरी देवता तुम्हीं निवडा कारण त्यांच्या नावावर जशी देवाच्या नावावर पुजारी मलिदा (प्रसाद) हादडतो तसे शेतकऱ्याच्या नावावर मलिदा ,भाड खाणारे APMC दलाल, हडपणारे देखील कमी नाहीत.
शेतकऱ्याला म्हणा तुला तुझ्या हक्काचे पैसे देतो तू चांगला माल पीकव.
पहा तो पिकवतो का नाही ते?
त्याला फक्त अक्कल शिकवू नका.
त्याला ही चांगले वाईट कळते.
तुमच्या ताटात येणाऱ्या फळे भाजीपाल्यावर औषधें फवारायची त्याला काही मुद्दाम हौस नाही…
तुमच्याच हव्यासापायी त्याला कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायला तुम्हीच भाग पाडले. कोण पोसणार त्याच्या पोराबाळांना.
ज्यादा उत्पन्नासाठी हायब्रीड वान आणले. त्याच्यासोबत कीड-रोग सुद्धा दिले. किड आणि रोगावर औषध मारता-मारता शेतकरी स्वतः मरू लागला त्याला जबाबदार कोण.
माझ्या मायबापांनो आता तरी डोळे उघडा आणि शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे द्या. तो तुम्हाला भरभरून देईल.
“सतत तीन वर्षे अस्मानी सुलतानी संकट (१कोविड काळ,२)अवकाळी पाऊस,३) गारपीट वादळवारा)या कालखंडात शेतकरी,शेती यासाठी केंद्र राज्य सरकारकडून शून्य मदत…!”
“सांगा बरं …!कुठं चुकतंय…!!?”
⚫🙏