
सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन बोराडे यांच्या प्रयत्नाला यश.
हरंगुळ (बु.) वरवंटी शिवरस्ता कामासाठी ४० लाख रुपये मंजूर…
लातूर / प्रतिनिधी : लातूर महानगरालगत असलेले हरंगुळ (बु.) गाव हे फार झपाट्याने विस्तारले जात आसले तरी रस्त्याच्या बाबतीत मात्र दैयनिय आवस्था हैती.
हरंगुळ वरवंटी शिवरस्त्यालगत हरंगुळ च्या हद्दीत गोविंद नगर, गोपाळ नगर, सदाशिव नगर, विठ्ठल नगर, गायत्री नगर, गुरुमाऊली नगर, अशी वेगवेगळी कॉलनी येथे वसलेली आहेत. मात्र कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात या भागातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. या भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हरंगुळ चे सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन बोराडे मानव विकास संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष याच्या माध्यमातून हा रस्ता होण्यासाठी माजी मंत्री अमित देशमुख यांनाही निवेदन देण्यात आले होते,पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे.
मागील पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जायला ही खूप कसरत करावी लागत होती यावेळेस माजी मंत्री अमित देशमुख साहेब यांनीही मागील पावसाळ्यामध्ये या रस्त्यासाठी रस्त्याची डागडुजी करून रस्ता दुरुस्त करून घेतला होता. हरंगुळ वरवंटी शिव रस्त्यासाठी परिसरातील समस्या कडे लक्ष घालून रस्त्याच्या नूतनीकरण कामाबाबत साहेबांच्या सतत लक्ष घालून कामासाठी प्रशासनाकडून ४० लाख रुपये मंजूर केले आहेत. लवकरच या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
हरंगुळ (बु.) वरवंटी शिवरस्ता मंजूर करून ४० लाख रुपये निधीस मंजुरी दिल्याबद्दल सुदर्शन बोराडे यांनी प्रशासनाचे व मा.मंत्री अमित भैया विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त केले.
सुदर्शन बोराडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी सुदर्शन बोराडे यांचे कौतुक करीत आहेत.