लातुर / प्रतिनिधी : जिल्ह्यामध्ये पिक विमाधारक शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकर्यांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत खालील ईमेलवर,किंवा अँपवर,किंवा टोल फ्री वर काँल करुन आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पुर्वसुचना पिक विमा कंपनीला कळवा
टोल फ्री क्रमांक : 18004195004
(एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी मुबंई)
ईमेल :
पीकविमा ॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
🤝🏻🌾
अथवा ऑनलाईन पद्धतीने पुर्वसुचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाईन पध्दतीने संबंधित तालुका प्रतिनिधी, पिक विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडे अर्ज करावा आसे आवाहन कृषी विभाग लातुर च्या वतीने करण्यात आले आहे.