रंगीत सुरवातीला नजारा हिरवळला प्रामाणिक वाटेवर छंद फुलला निसर्गाच्या गमतीत आयुष्य मांडले स्वभावाच्या हिमतीवर कष्ट गाजले शुध्द तोंडाने सत्य बोलावे तीक्ष्ण डोळ्यांनी सत्य पहावे चतुर बुद्धीने सत्य गाठावे तरच आयुष्य जगावे
फुला आधी कळी, कळी नंतर फुल बनते जन्मा नंतर आदर्शाने गोड विचारांनी आयुष्य जगते आकाशाच्या वरती अवकाश असते भूतकाळानंतर भविष्य घडते भविष्याच्या दिशेने स्वप्न पाहते त्याच सत्याने प्रामाणिक ओळख बनते
घर बांधण्यसाठी विटेची संगत सिमेंट असते आयुष्य जगण्यासाठी संस्कृती लागते सोबती संगती साथ देत, आयुष्य लढण्यासाठी स्वतःच धावते आयुष्य सुख देते तर दुःख ही देते दुःख विसरून सुख निर्माण करते जोडुनी नाती रंग संगतीने राहावे तरच आयुष्य जगावे…….
✍️ प्रांजल आढाव