देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने देवणी येथे तुळजाभवानी आईच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक भक्तासाठी मोफत जेवण दिले जाणार
देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील देवणी शहरात देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा या संघटनेच्या वतीने निलंगा उदगीर व एच पी पेट्रोल पंपांजवळ देवा ग्रुपच्या वतीने नऊ दिवस मोफत जेवण देण्यात येणार आहे , देवा ग्रुपचे देवणी तालुकाध्यक्ष कृष्णा वजन, उपाध्यक्ष राहुल कांबळे यांच्या संकल्पनेतून एक विचार मनातुन अन्य छत्र वाटप करण्यात यावे म्हणून देवणी शहरात नवरात्रोत्सव निमित्त महाप्रसादाचे कार्यक्रमाचे उद्घाटन देवणीचे गटशिक्षणाधिकारी बोयनवाड व्ही ,एन, वजनम राजाराम साधन व्यक्ती, सुभाष मेह्त्रे,पत्रकार रणदिवे लक्ष्मण, बालाजी टाळिकोटे, कृष्णा पिजरे ,देवा ग्रुपचे तालुकाध्यक्ष कृष्णा वजनम, उपाध्यक्ष राहुल कांबळे, शिवसेनेचे देवणी शहराध्यक्ष दिपक मळभागे, महेश मोतिरावे, राज सुर्यवंशी,मन्मथ जिवणे,लहु लोकरे, पिरपाशा शेख, शौकत मिर्झा,यांच्या उपस्थितीत अन्य छत्राचे उद्घाटन करण्यात आले , तुळजापूरला तुळजाभवानीच्या पायी जाणाऱ्या भाविक भक्तांना मोफत जेवण सोय करण्यात आली आहे तरी भाविक भक्तांनी मोफत जेवणाचा लाभ घ्यावा,