एल्डरलाईन १४५६७ मुळे मिळाला बेघर आजींना निवारा.
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी शहरात राहत असलेली वेडसर महिला देवणी बस्थकानात उघड्यावर राहणारी महिला एक सामाजिक कार्यकर्ते यांनी दिनांक २१ एप्रिल रोजी देवणी तालुक्यातील बस स्थानक येथील आवारात मागिल सहा महिन्यांपासून बेघर झालेली एक जेष्ठ नागरिक महिला राहीत होती ही बातमी जेव्हा सामाजिक कार्यकर्ता वरूणराज सूर्यवंशी यांना कळाली तेव्हा त्यांनी या महिलेच्या आश्रेयसाठी व निवास स्थान शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले तेव्हा त्यांना ऍड.सुजाता माने मॅडम आणि ऍड शिंदे मॅडम यांनी एल्डरलाईन हेल्पलाईन १४५६७ बद्दल ची माहिती दिली तेव्हा त्यांनी जेष्ठाना विशेष सेवा पुरवणाऱ्या एल्डरलाईन १४५६७ या राष्ट्रीय हेल्पलाईन ला संपर्क साधला सामाजिक न्याय सबलीकरण मंत्रालय भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय महाराष्ट्र शासन व जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असलेली अशी ही हेल्पलाईन आहे. हेल्पलाईन शी संपर्क साधला आणि सदरील सर्व प्रकरण हे हेल्पलाईन च्या अधिकारी यांना सांगण्यात आले तेव्हा हेल्पलाईन कडून सांगण्यात आले कि आमचा अधिकारी लगेचच येऊन प्रत्यक्ष मदत करतील. त्यांनतर लगेचच लातूर आणि धाराशिव चे क्षेत्रीय अधिकारी असलेले श्री.अक्षय साळुंके यांनी लगेचच समाजसेवक वरुणराज सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला आणि लगेचच लातूर वरून देवणी कडे प्रस्थान केले आणि सुमारे आडीच तासाच्या आत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने महिलेची विचारपूस केली तर त्या वेळी महिला ही कोलकता येतील असल्याचे समजले आणि महिला ही उच्च शिक्षित असून ती हिंदी आणि इंग्लिश या भाषेचा उपयोग करत होती त्यानंन्तर जेष्ठ महिलेला खाण्यासाठी अन्न दिले आणि प्यायला थंड पेय देण्यात आले आणि या महिलेची ग्रामीण रुग्णालय देवणी येथे प्राथमिक तपासणी केली यावेळी एल्डरलाईन १४५६७ चे अधिकारी श्री अक्षय साळुंके आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे सर देवणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तांबोळी सर व वैद्यकीय अधिकारी मुंडे मॅडम व देवणी आगार चे आगार प्रमुख शंकर पाटील व सामाजिक कार्यकर्ता वरूणराज सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले व नन्तर या महिलेला नवीन कपडे परिदान करून श्री अक्षय साळुंके यांनी तुषार शिंदे यांच्या सोबत या बेघर महिलेला आपल्या स्वतःच्या गाडीत बसवून आजींशी मस्त गप्पा गोष्टी करत त्यांना देवणी ते कासार्षीरशी, तालुका निलंगा येथील श्रीमती मनीषा होळकर यांच्या एकता बहुउद्देशीय संस्था संचलित आधार वृद्धाश्रम येथे आजींना मानाने स्वागत करून दाखल करून घेण्यात आले त्यावेळी वृद्धाश्रमातील कर्मचारी श्री. महादेव बिरादार (भाटे) व रागिणी राजशेखर बोरामने यांनी सहकार्य केले व त्यांनी दुसऱ्या दिवशी दिनांक २२ एप्रिल रोजी आजींना स्वच्छ अंघोळ वगैरे घातली आणि नवीन छान ड्रेस आजींना घालायला दिला आहे आणि आता आजींची चांगल्या प्रकारे काळजी आधार वृद्धाश्रम घेतली जात आहे आणि अश्या प्रकारे एल्डरलाईन १४५६७ मुळे आज आणखीन एका बेघर जेष्ठ नागरिकाला निवारा मिळाला आहे यामुळे देवणी परिसरातील लोकांकडून या कार्याबाबत आनंद व्यक्त केला जात आहे .