मुख्याधिकारी करतायत मनमानी कारभार ; याला जबाबदार कोण.?

देवणी नगर पंचायला कायम स्वरुपी मुख़्याधिकारी देण्याची मागणी

देवणी  / प्रतिनिधी : येथील मुख्याधिकारी न प यांचा अतिरिक्त पदभार कमी करुन कायम स्वरुपी मुख्याधिकारी द्यावे कारण निलंगा येथील मुख्याधिकारी श्री गजानन शिंदे हे मुख्याधिकारी म्हणून मागील दीड वर्षापासून अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत त्यांची निलंगा येथे नियमित नियुक्ती आहे निलंगा येथील कामकाजाचा व्याप खूप असल्यामुळे ते देवणीं न प येथे आठवड्यातून एक दिवस सुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे सामान्य नारीकांची सर्व कामे ठप्प आहेत त्यासोबतचं नगराध्यक्षा, सर्व सभापती व सर्व नगरसेवक यांच्यात मुख्याधिकारी यांचा समन्वय नसल्यामुळे विकास व नियोजन कामे मार्गी लावण्यास अनेक अडचणी येत आहेत. आहेत.यासंबंधात न प च्यां सर्व साधारण सभेत दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी संबंधित विषयी मुख्याधिकारी शिंदे यांचा अतिरिक्त पदभार कमी करून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेपर्यंत न प उदगीर येथील मुख्याधिकारी श्री बोंदर साहेब यांना मुख्याधिकारी म्हणून देण्यात यावे असा सर्व संमतीने ठराव न प देवणी सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला होता व हा ठराव दिनांक 05 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे सुपूर्द केला होता तरी आज पर्यंत त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही येत्या 29 फेब्रुवारी 2024 रोजी पर्यंत संबंधित विषयानुसार कार्यवाही करावी ही नम्र विनंती, जर कार्यवाही करण्यात दिरंगाई झाल्यास 01 मार्च 2024 रोजी न प अध्यक्ष, उपाध्यक्ष गटनेता तसेच सर्व सभापती व नगरसेवक मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे लेखी निवेदण नगर पंचायतीच्या वतीने जिल्हा सह आयुक्त नगर पालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर.
यांना देण्यात आले आहे निवेदनावर देवणी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष कीर्ती ताई घोरपडे, नगर उपाध्यक्ष अमित मानकरी, जमिर तांबोळी,प्रविण बेळे,वंदना बंडगर,सत्यभामा घोलपे,अनिल इंगोले, विमलताई बोरे, बानुबेगम मोमिन, नगर अध्यक्षा उपनगर अध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp