देवणी तालुक्याकडे माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा आजही कानाडोळा”

देवणी तालुका विकासापासून का आहे दूर…?
पत्रकार परिषदेत गोलमाल उत्तरे देत नियोजित पत्रकार परिषद संपली..!!

देवणी / प्रतिनिधी : होऊ घातलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा हैट्रीक करण्यासाठी जिवाचे रान करनारे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर निवडणूक प्रचार्थ सभा मेळावे घेत आसून त्याचाच भाग म्हणून दिनांक 12नोव्हेंबर रोजी भाजपाचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय भूप्रष्ठ वाहतूक मंत्री न्यू इंडियाच्या व्हिजनचा चेहरा मा.ना. नितीन गडकरी साहेब यांची जन स्वाभिमान सभा देवणी येथे होत आसून त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते तथा संभाजीराव पाटील यांचे बंधू आरविंद पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद अमर पाटील यांच्या निवासस्थानी घेतली.
सदर पत्रकार परिषदेत देवणी तालुक्यातील विकासासाठी कटाक्षाने लक्ष घालने गरजेचे आसलेले मतदारसंघाचे पंधरा वर्षापासून प्रतिनिधीत्व करणारे आमदार म्हणून माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विकास करायला पाहिजे होता तो न झाल्याने लोकांच्या मनातील जनभावना पत्रकारांनी आरविंद भैय्या निलंगेकर यांना काही प्रश्न विचारले ते पुढील प्रमाणे आहेत.
देवणी तालुका देवणी वळूचे उगमस्थान आसून सुद्धा देवणी वळू संशोधन केंद्र बिड जिल्ह्यातील परळीला कसे काय गेले.?सत्ताधारी आणी मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून नेमके काय केलात ? काही केलात तर मग संशोधन केंद्र परळीला गेले कसे..?
देवणी तालुक्यातून एकही महामार्ग गेला नाही त्यासाठी काय प्रयत्न केलात..?
देवणीला एस.टी.महामंडळाच्या आगारासाठी काय प्रयत्न केलात.?
देवणीच्या कायम पाणीपुरवठा कामासंदर्भात काय प्रयत्न केलात.?
देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एमआयडीसी मंजुरीसाठी काय प्रयत्न केलात.?
शासकीय ईमारतींसाठी काय प्रयत्न केलात?
विजवितरनाचे रस्त्याच्या कडेला आसलेल्या धोकादायक खांबे काढून सुरक्षिततेच्या दृष्टीने काय प्रयत्न केलात.?
गेल्या पाच वर्षापासून तोगरी फाटा ते लांबोटा रस्ता आजूनही पूर्ण झाला नाही त्यासाठी का प्रयत्न केले नाहीत.?
पत्रकार संघाच्या वतीने आनेक वर्षापासून मागणी आसलेल्या पत्रकार भवनसाठी कोणते प्रयत्न केलात?
तालुका स्तरावरील क्रिडांगण निर्मिती चे काय झाले.?
शेतकऱ्यांच्या उत्पादन हमीभाव साठी काय प्रयत्न केलात?
देवणी तालुक्याला सावत्रपणाची का वागणूक देता.?आदी प्रश्नांची सरबती झाल्यानंतर एकाही प्रश्नाचे ठोस किंवा समर्पक उत्तरे दिली नाहीत त्यामुळे पत्रकार परिषद हि एकर्फी झाल्याचे पत्रकार परिषेदेत चित्र दिसून आली.कारण सर्व प्रश्न देवणी तालुक्यातील विकासासंदर्भात आसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तरे मात्र आद्याप मिळाले का हा मात्र सवाल तसाच राहिला आहे.